ETV Bharat / city

Reopening multiplex : चित्रपटगृह सज्ज, शुक्रवारपासून प्रेक्षकांना पाहता येतील चित्रपट - etv bharat live

दीड वर्षानंतर चित्रपटगृह सुरू करत असताना महाराष्ट्राचे आभार मानण्यासाठी आयनॉक्स सिनेमा यांच्यातर्फे सकाळी नऊ ते दहा दरम्यान असणारे सर्व चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद महाराष्ट्र या संकल्पनेतून हे चित्रपट प्रेक्षकांना मोफत बघायला मिळणार आहे.

reopening multiplex
reopening multiplex
author img

By

Published : Oct 21, 2021, 7:08 PM IST

औरंगाबाद - दीड वर्षाच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सिनेमगृह सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपट प्रेमींना पुन्हा सिनेमागृहात जाऊन चित्रपटांची मेजवानी अनुभवता येईल. त्यासाठी सरकारी नियमावली जारी करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी प्रेक्षकांना करावी लागणारी लागणार आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स सिनेमातून केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

चित्रपटगृह सज्ज
सिनेमागृह झाले सज्ज
चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृह सज्ज झाले आहेत. सिनेमागृहात प्रवेश घेत असताना प्रेक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे असणे बंधनकारक आहे. जर लस घेतली नसल्यास आरोग्य सेतू ॲप मध्ये असलेली माहिती पडताळल्यानंतर सिनेमागृहात प्रवेश देण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सिनेमागृहात जाता येईल त्यातही चित्रपट पाहताना अर्ध्या क्षमतेच्या अनुषंगाने प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल. एक चित्रपट संपल्यावर दुसरा चित्रपट सुरू करताना अर्ध्या तासाचे अंतर ठेवण्यात आले आहे. या वेळेत सिनेमागृह निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद आयनॉक्स चित्रपटगृहाचे व्यवस्थापक दशरथ खजिनदार यांनी दिली.
प्रेक्षकांना पहिल्या दिवशी मोफत चित्रपट
दीड वर्षानंतर चित्रपटगृह सुरू करत असताना महाराष्ट्राचे आभार मानण्यासाठी आयनॉक्स सिनेमा यांच्यातर्फे सकाळी नऊ ते दहा दरम्यान असणारे सर्व चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद महाराष्ट्र या संकल्पनेतून हे चित्रपट प्रेक्षकांना मोफत बघायला मिळणार आहे. इतकेच नाही तर सध्या क्रिकेट 20 - 20 विश्वकप होत असून त्याचा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवता यावा, यासाठी भारताचे सर्व सामने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे आठ सामने चित्रपटगृहात प्रक्षेपित करण्यात येतील. आणि त्यासाठी देखील नियमावलीचे पालन केले जाईल अशी माहितीही आयनॉक्स चित्रपटगृहाचे व्यवस्थापक दशरथ खजिनदार यांनी दिली.

हेही वाचा - VIDEO : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पाडेंबरोबर एनसीबी कार्यालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.