ETV Bharat / city

Raj Thackeray Aurangabad Sabha : मशिदीवरील भोंग्यांसाठी 4 तारखेचा अल्टीमेटम, त्यानंतर आम्ही ऐकणार नाही - राज ठाकरे

आज मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray Sabha ) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा ( Raj Thackeray On Mosque Loudspeaker ) मुद्द्याचा पुर्नउच्चार केला. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पिकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Raj Thackeray Live Update
Raj Thackeray Live Update
author img

By

Published : May 1, 2022, 9:08 PM IST

Updated : May 1, 2022, 10:33 PM IST

औरंगाबाद - आज मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray Sabha ) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा ( Raj Thackeray On Mosque Loudspeaker ) मुद्द्याचा पुर्नउच्चार केला. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पिकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, सगळेच्या सगळे लाऊडस्पिकर हे अनधिकृत आहेत. ते 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर सर्व मशिदीसमोर हनुमान चालीस लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : Raj Thackeray Aurangabad Sabha : सभेदरम्यान अजान सुरु झाल्याने राज ठाकरे संतापले, म्हणाले....

काय म्हणाले राज ठाकरे? - मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. मुस्लीम समाजानेही हे नीट समजून घेण्याची गरज आहे. पुण्यात मला एक पत्रकार भेटायला आले. ते मुस्लीम समाजाचे आहेत. त्यांनी सांगितले की माझ्या मुलाला लाऊडस्पिकरचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी मौलवीला जाऊन सांगितले की लाऊडस्पिकरच्या आवाजाचा माझ्या मुलाला त्रास होत आहे. त्याला झोप लागत नाही. तेव्हा आवाज कमी केला, खरं तर लाऊडस्पीकरचा मुद्दा हा धार्मिक नसून समाजिक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पिकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • Today is first day of Maharashtra (Maharashtra Day). I won't listen from 4th day from now. Wherever we'll see a loudspeaker, we'll also chant Hanuman Chalisa in front of the loudspeaker. I request Police to stop loudspeakers. If they won't listen, we'll take action: Raj Thackeray pic.twitter.com/ojXCCGZ0Xf

    — ANI (@ANI) May 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंची पुन्हा शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, 'जाती-जातीमध्ये...'

भोंग्यासाठी 4 तारखेचा अल्टीमेटम - औरंगाबादमध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची येथे कॉन्सर्ट चालते का? देशातील सगळ्या मशिदींवरील लाऊडस्पिकर उतरले पाहिजे. सर्वांना समान नियम असला पाहिजे. तुम्हाला कोणी अधिकार दिला रस्त्यावर येण्याचा. रस्त्यावर येऊन नमाज पढला जात आहे. माझी शासनाला विनंती आहे. तीन तारखेला ईद आहे. मला त्यांच्या सणात कुठल्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. चार तारखे पासून भोंगे उतरले पाहिजे, त्यानंतर आम्ही ऐकणार नाही. मशिदीसमोर हनुमान चालीस लाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा : Raj Thackeray Full Speech Aurangabad : राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सभेतील संपूर्ण भाषण जसेच्या तसे..

भाषणादरम्यान अजान सुरु झाली आणि...

सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांचे भाषण सुरू होते. यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलत असताना, अचानक अजान सुरू झाल्यानंतर राज ठाकरे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. पोलिसांना विनंती करत ते म्हणाले, जर सभेच्या वेळी अजान सुरु होणार असेल, तर आपण ताबडतोब त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा किंवा आताच्या आता हा आवाज बंद करावा, असे राज ठाकरे म्हणाले. जर हे सरळ भाषेत समजून घेत नसतील, तर जे काय व्हायचे आहे, ते होऊन जाऊ द्या. अभी नही तो कभी नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray Criticized Raj Thackeray : असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिलेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

Last Updated : May 1, 2022, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.