ETV Bharat / city

जटवाडा परिसरात शेतीच्या वादातून दोन गटात राडा, मारामारीत महिलेचा गर्भपात - औरंगाबादमध्ये दोन गटात हाणामारी

औरंगाबाद शहराजवळील जटवाडा येथे गुरुवारी सायंकाळी शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका महिलेचा गर्भपात झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Miscarriage of a woman in a fight between two groups

author img

By

Published : Apr 30, 2021, 4:54 PM IST

Updated : Apr 30, 2021, 5:04 PM IST

औरंगाबाद - शहराजवळील जटवाडा येथे गुरुवारी सायंकाळी शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका महिलेचा गर्भपात झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जटवाडा परिसरात शेतीच्या वादातून दोन गटात राडा
शेतीच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. सदरील घटनेचे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हातात मिळेल त्या वस्तूने काही लोक एकमेकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यात दोन महिला ओरडत असल्याचे दिसून आले. मात्र या घटनेत एका महिलेचा गर्भपात झाला आहे. पीडित महिला अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. सदर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. याबाबत अधिकची चौकशी पोलीस करत आहेत.

Last Updated : Apr 30, 2021, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.