ETV Bharat / city

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना धमकी

author img

By

Published : Sep 25, 2019, 2:48 PM IST

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील

औरंगाबाद - उस्मानाबाद येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली. यानंतर त्यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात महामंडळ अद्याप कोणतीही तक्रार देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत आहेत.

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चन धर्मीय असून, काही लोक त्यांना साहित्यिक समजत नसल्याने विरोध होत आहे, असे कौतीकराव ठाले पाटील यांनी सांगितले. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणी होत असली, तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा फ्रान्सिस दिब्रिटोंचे साहित्य निधर्मीय - श्रीपाल सबनीस

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे साहित्यिक असून, त्यांच्याकडे साहित्यिक म्हणूनच पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सरकारने मराठी पाठ्य पुस्तक मंडळाच्या सदस्यांमध्ये त्यांची निवड केली आहे. सरकारने केलेली निवड चालते; आमची निवड का चालत नाही? असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
एखाद्या आमदार किंवा खासदाराची निवड केल्यावर काही लोकांच्या सांगण्यावरून ती रद्द करता येत नाही; तसेच आम्ही केलेली निवड रद्द करता येणार नाही, असे कौतीकराव ठाले म्हणाले.

Intro:उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यावर आता त्यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत असल्याचं समोर आलं. या बाबत महामंडळ अद्याप तक्रार देण्याच्या मनस्थितीत नसल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं.

Body:ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चन असल्याने त्यांना विरोध होत आहे. त्यांना लेखक साहित्यिक समजत नसल्याने त्यांना विरोध केला जातोय. अध्यक्ष बदला अशी मागणी केली जात असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचं मत कौतीकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.

Conclusion:ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे साहित्यिक म्हणून पाहिलं पाहिजे. ते साहित्यिक आहेत. सरकारने मराठी पाठ्य पुस्तक मंडळाच्या सदस्यांमध्ये त्यांची निवड केली आहे. साहित्यिक म्हणून सरकारने केलेली निवड चालते आणि आमची निवड का चालत नाही? असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी उपस्थित केला. एखाद्या आमदार खासदाराची निवड केल्यावर काही लोकांच्या सांगण्यावरून ती रद्द करता येत नाही तसच आम्ही केलेली निवड रद्द करता येणार नाही. अस कौतीकराव ठाले पाटील यांनी सांगितलं. कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.