औरंगाबाद - मराठवाडा मुक्ती संग्राम ( Marathwada Liberation War ) म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन ( Hyderabad Liberation War ) यंदा राजकीय वादामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न होतो. मात्र यंदा हैदराबाद येथे असलेल्या सोहळ्यामुळे सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी घेतला आहे. मात्र हाच निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात फसला असून सकाळी नऊ वाजता शिवसेनेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात येईल, अशी घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Legislative Council Leader of Opposition Ambadas Danve ) यांनी केली आहे.
मुक्ती संग्राम ध्वजारोहणाची वेळ बदलली...भारत स्वतंत्र झाल्यावर तब्बल तेरा महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला. निजामाच्या तावडीत असलेला प्रदेश स्वतंत्र करताना वेगळा लढा उभारावा लागला. मात्र हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सकाळी नऊ वाजता मुख्य ध्वजारोहण ( Mukti Samram flag hoisting time changed ) सोहळा सिद्धार्थ उद्यानात पार पडतो. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असताना, केंद्र सरकारने हैदराबाद येथे तीन राज्यांचा संयुक्त असा सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोहळ्याला उपस्थित राहता यावं याकरिता सकाळी नऊ ऐवजी सात वाजता मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडेल अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमाचा नियोजित कार्यक्रम देखील निश्चित करण्यात आला आहे.
शिवसेना करणार नऊ वाजता ध्वजारोहण...17 सप्टेंबर रोजी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री नऊ वाजता मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडतात. मात्र यंदा पहिल्यांदाच सकाळी सात वाजता मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडेल अशी घोषणा प्रशासनाने केली आहे. शासनाचा हाच निर्णय आता वादाच्या भरात अडकला आहे. दरवर्षीची वेळ यंदा का बदलली, दिल्लीहून येणारा बादशहा त्याच्यासाठी वेळ का बदलावी? असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तर ध्वजारोहणाची नियोजित वेळेला सकाळी नऊ वाजताच आम्ही पार पाडू अशी घोषणा त्यांनी केली, त्यामुळे आता सकाळी पुन्हा एकदा राजकीय वादाला नव्या वादाला तोंड फुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.