औरंगाबाद : बापाने आपली मुलगीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्या मुलीला शोधूनही काढले. मात्र, त्यानंतर एक धक्कादायक प्रकार (Extremely disgusting incident) समोर आला आहे. ते म्हणजे जन्मदात्या पित्याने अत्याचार (Rape by the birth father) केल्यामुळे आपणहून पळून गेले असल्याचा, असा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. विशेष म्हणजे या पित्यावर सात वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असून, तो जामिनावर बाहेर आला आहे.
मुलीची अपहरण झाल्याची तक्रार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 मे रोजी एका पित्याने सिडको परिसरात शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याबाबत मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास करीत बीड येथून मुलीला परत आणले. त्यावेळी अपहरणाबाबत विचारणा केली असता, आपण स्वतःहून घरातून निघून गेल्याच तीने सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये वडिलांकडूनच लैंगिक शोषण होत असल्याच तिने पोलिसांना सांगितलं. पुंडलिकनगर भागात हा अत्याचार होत होता, असे मुलीने सांगितल्यावर या घटनेबाबत पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तो पुंडलिकनगर पोलिसांत वर्ग करण्यात आला.
या आधी मुलीच्या अपहरणात बाप दोषी : स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप एका वाहनावर चालक म्हणून काम करतो. 2013 मध्ये एका सात वर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तो दोषी आढळून आला होता. तर त्याला शिक्षा झाल्यावर तो जामिनावर बाहेर आला होता. मात्र, आता मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : Amravati Court : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाला वीस वर्षांचा कारावास