ETV Bharat / city

जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार; पीडितेचा जीवन–मृत्युशी संघर्ष - लैंगिक अत्याचार

मूळ जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणी मुंबई येथे भावाकडे राहायला गेली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी 6 च्या सुमारास घरी आली तेव्हा तिची परिस्थिती खूपच खराब झाली होती.

जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईत सामूहिक बलात्कार पीडितेचा जीवन – मृत्यूचा संघर्ष
author img

By

Published : Aug 1, 2019, 2:00 PM IST

औरंगाबाद - मुंबई शहरात आपल्या भावाकडे राहायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली आहे. घाटी रुग्णालयात तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष चालू आहे. या प्रकारांची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने घाटी रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक ती प्राथमिक माहिती मिळवून पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती जबाब देऊ शकत नाही. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईत सामूहिक बलात्कार पीडितेचा जीवन – मृत्यूचा संघर्ष

मूळ जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणी मुंबई येथे भावाकडे राहायला गेली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी 6 च्या सुमारास घरी आली तेव्हा तिची परिस्थिती खूपच खराब झाली होती. घरी येताच ती काही न सांगता झोपी गेली. दोन दिवस ती झोपेतून उठत नसल्याने पीडितेच्या भावाने ही बाब आई-वडिलांना सांगून त्यांना मुंबई येथे बोलावून घेतले. आई-वडिलांना पीडितेला अर्धाअंगवायू सदृश्य आजार झाला असावा, असे वाटल्याने त्यांनी पिडितेला गावी आणले आणि डॉक्टरांना दाखवले. मात्र, तसा प्रकार नसल्याने त्यांनी अधिक उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर एमएलसी नोंद करण्यात आली.

25 जुलै 2019 पासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी लेखी विनंती केली. मात्र, पीडिता जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस बेगमपुरा पोलिसांनी पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने अखेर पीडितेच्या वडिलांचा जबाब घेऊन अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 376, 34 अन्वये बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल केलला गुन्हा पुढील तपासासाठी बेगमपुरा पोलिसांनी, चुनाभट्टी पोलीस ठाणे मुंबई यांच्याकडे वर्ग केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Intro:मुंबईत आपल्या भावाकडे राहायला गेलेल्या 19 वर्षीय युवतीवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली असून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिचा जीवन -मृत्यूचा संघर्ष चालू आहे. या प्रकारांची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीसानी अत्यंत तत्परतेने घाटी रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक ती प्राथमिक माहिती मिळवून पीडितेच्या जबाब घेण्याचा प्रयत्न केला परंतु पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती जबाब देऊ शकत नाही.पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:मूळ जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय युवती मुंबई येथे भावाकडे राहायला गेली होती. सुमारे दोन आठवड्यापूर्वी ती मैत्रीच्या वाढदिवसाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. व संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ती घरी आली तेंव्हा ती चालण्या बोलण्याच्या योग्य स्थितीत न्हवती घरी येताच ती काही न सांगता झोपी गेले.दोन दिवस ती पलंगावरून उठत नसल्याने पीडितेच्या भावाने ही बाब आई वडिलांना सांगून त्यांना मुंबई येथे बोलावून घेतले व आई वडिलांना पीडितेला अर्धअंगवायू सदृश्य आजार झाला असावा असे वाटल्याने त्यांनी पिडितेला गावी आणले व डॉक्टरांना दाखविले मात्र तसा प्रकार नसल्याने त्यांनी अधिक उपचारासाठी युवतीला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले असता युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.व त्या नंतर एम एल सी नोंद करण्यात आली
दिनांक 25 जुलै 2019 पासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी लेखी विनंती केली ,  मात्र सदर पीडित जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोन दिवस बेगमपुरा पोलिसांनी सदर पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला परंतु पीडितेच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने अखेर पीडितेच्या वडीलांचा जबाब घेऊन अज्ञात आरोपींविरुद्ध भादवि 376,  34 अन्वये  बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  दाखल केलला हा गुन्हा पुढील तपासासाठी बेगमपुरा पोलिसांनी,  चुनाभट्टी पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडे वर्ग केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

Conclusion:पीडितेच्या वतीने तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदर मुलगी वय 19 ही आपल्या दोन भावांचा समवेत चेंबूर येथे राहत होती. दरम्यान 14 जुलै रोजी मुलाचा फोन आला कि, राणी ( काल्पनिक नाव ) आजारी असून तिच्यावर उपचार केले तरी  तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही , तुम्ही मुंबईला या . त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो आणि व 17 जुलै रोजी प्रियाला सोबत घेऊन  रेल्वेने परतूरला आलो.  तेथून आम्ही आमच्या गावी आलो.  गावातील डॉक्टरांना डॉक्टरांकडे तिला उपचारासाठी नेले परंतु तिच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्यामुळे अखेर दि . 25 जुलै रोजी आम्ही तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  तिच्यावर उपचार करत असताना डॉक्टरांनी आम्हाला विश्वासात घेऊन सांगितले कि , राणी वर  लैंगिक अत्याचार झाले आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे.  दरम्यान मी व तिच्या  आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने सांगितले कि , ७ जुलै २०१९ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिने तिच्या वहिनीला सकाळी १० वाजता सांगितले कि , ती तिच्या मैत्रिणीच्या वाढ दिवसाला जात आहे आणि सायंकाळी ६ वाजता घरी परत आली पण कुणाशीही बोलली नाही. दरम्यान तिने आम्हाला सांगितले कि , तिच्यावर चार इसमांनी लैंगिक अत्याचार केले पण त्या  चौघांची नवे मात्र तिने अद्याप सांगितले नाही. सदर प्रकरण चेंबूर , लाल डोंगर परिसर येथे घडल्याचे सांगत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित नराधमांचा शोध घेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्यांना अटक करावी.
दरम्यान पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात ०/२०१९ नुसार  भादवि 376 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी चुनाभट्टी पोलिस ठाणे मुंबई यांच्याकडे अधिक तपासासाठी वर्ग केला आहे.

बाईट- पीडितेचे वडील
बाईट- डॉ.नागनाथ कोडे
(acp crime branch)

टीप- कृपया पीडिता आणि बाईट मध्ये पीडितेच्या वडिलांचा चेहरा ब्लर करावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.