ETV Bharat / city

शेतकऱ्यांचे लचके तोडणारे तरस अखेर जेरबंद, बनशेंद्रा परिसरात वनविभागाची कारवाई - Forest department success in catching Hyena

कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा परिसरात गेल्या काही दिवसापासून एका तरसाने धुमाकूळ घातला होता. या तरसाला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे.

Forest department success in catching Hyena
कन्नडच्या बनशेंद्रा परिसरातील तरसाला पकडण्यात वनविभागाला यश
author img

By

Published : Dec 17, 2019, 12:02 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा, रेल, नावडी परिसरात लांडगा व तरस यांसारखे वन्य प्राणी आढळून येतात. बनशेंद्रा परिसरात गेल्या काही दिवसापासून एका तरसाने धुमाकूळ घातला होता. या तरसाला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. तरसाने अनेक शेतकरी महिला व पुरुषांना चावा घेवून जखमी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

बनशेंद्रा परिसरात वनविभागाची कारवाई, तरसाला पकडण्यात वनविभागाला यश

हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न

सहाय्यक वंसरक्षक सचिन शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली या वन्यप्राण्यांना पकडन्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. अखेर या पथकाने तालुक्यातील बनशेंद्रा परिसरात तरसाला पकडून जेरबंद केल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यानी सुटकेचा श्वास सोडला आहे.

हेही वाचा... केंद्र सरकारकडून राज्यांना ३५ हजार कोटींचा जीएसटी मोबदला वितरित

बनशेंद्रा भागातील रेल नावडी शिवाराकडून एक लांडगा डोंगर ओलांडून वनक्षेत्राकडून आला. यानंतर शेतात काम करत असलेल्या कुलसमबी इमाम पठाण यांच्यावर त्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर रमेश भिकन वाघ, हकीम नबाब शेख यांच्यावरही हल्ला केला होता. या प्रमाणेच तालुक्यातील रेल नावडी परिसरात तरस या वन्यप्राण्यानेही गेले काही दिवस हौदोस घातला होता. त्याने केलेल्या हल्लात दोन महिला जखमी झाल्या होत्या. कल्पना विलास जाधव (वय ४०) कमलबाई लक्ष्मण जाधव (वय ५०) अशी त्या महिलांची नावे आहेत.

हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..

या तरसाला पकडण्यासाठी वनविभागाने वनरक्षक एम. ए. शेख व वन मजुर अशोक आव्हाड आदी कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली. या तरसाला पकडण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी जाळी लावली होती. या पथकाने अथक परिश्रम घेवून बनशेंद्रा शिवारात या तरसाला जेरबंद केले आसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांनी दिली आहे.

Intro:कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा, रेल, नावड़ी परिसरात लांडगा व तरस या वन्यप्राण्यानी धुमाकुळ घालून शेतकरी महिला व पुरुषां सह काही जनावरांना चावा घेवून जखमी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यासाठी सहाय्यक वंसरक्षक सचिन शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली या वन्यप्राण्याना पकडन्यासाठी पथकाची नेमणुक करण्यात आली होती. अखेर या पथकाने तालुक्यातील बनशेंद्रा परिसरात तरसाला पकडून जेरबंद केल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यानी सुटकेचा श्वास सोडला आहे.
Body:कन्नड़ तालुक्यातील बनशेंद्रा भागातील गट नंबर ७७, ७८ मध्ये रेल नावडी शिवाराकड़ून एक लांडगा डोगंर ओलांडून वनक्षेत्रा कडून आला व स्वतःच्या शेतात काम करत असलेल्या कुलसमबी इमाम पठाण यांच्या वर हल्ला करुन त्यांना गभीर जख्मी केले. तर पुढे येऊन रमेश भिकन वाघ यांच्या हाताला चावा घेऊन पुढे काम करत असलेल्या हकीम नबाब शेख याच्या वर हल्ला केला होता. याच प्रमाणे तालुक्यातील रेल -नावडी परिसरात तडस या वन्यप्राण्याने हल्ला केल्याने दोन महिला जखमी झाल्या. त्यापैकी एका महिलेवर उपचार करून घरी पाठवण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या महीलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. यात नावडी येथील कल्पना विलास जाधव ( ४० ) .ही महिला शनिवारी दुपारी शेतात जात असतांना तडसाने हल्ला केल्याने जखमी झाली तर रेल येथील कमलबाई लक्ष्मण जाधव ( ५० ) ही महिलाही शेतात जात असतांना तडसाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमी कमलबाई जाधव या महिलेला घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले होते.Conclusion:तर दुसऱ्या दिवशी चिखलठाण भागात ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली होती. यासाठी वनविभागाने वनरक्षक एम.ए. शेख व वन मजुर अशोक आव्हाड आदि कर्मचाऱ्याची एक टीम तयार करून वन्यप्राण्याना पकडन्यासाठी तैनात केली होती. या पथकाने अथक परिश्रम घेवून बनशेंद्रा शिवरात तरसाला जेरबंद केली आसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.