औरंगाबाद - महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोणाकडूनही एक रुपया घेऊ नये, असे आदेश आहेत. जर कोणी घेतले तर नक्कीच तातडीने कारवाई केली जाईल. मात्र, काही ठराविक परिस्थितीमध्ये शुल्क आकारण्याची मुभा दवाखान्यांना आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. पालकमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद जिल्ह्याची कोरोनाबाबतची आढावा बैठक घेतली. या बैठकीत संसर्ग थांबवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याचे निर्देश सुभाष देसाई यांनी दिले.
कोविड सेंटर असो की, रुग्णालय सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजे. त्यामाध्यमातून लक्ष ठेवणे सोपे होईल, त्याच बरोबर खाजगी रुग्णालयाच्या अनेक तक्रारी आहेत. त्यात वाढीव शुल्क आकारण्याचा तक्रारी जास्त आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑडिटर नेमावा लागेल. यामध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य होईल. रुग्णाला नातेवाईकांना पाहता यावे, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - ठाणे मृतदेह प्रकरण : भाजप नेत्यांसह पीडित कुटुंबीयांनी राज्यपालांची घेतली भेट
औरंगाबादमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. याचा आढावा घेण्यात आला. त्यात कोरोनाची साखळी थांबवण्यासाठी काही उपाय योजना करायला हव्या, संपर्कातील लोकांच्या चाचण्या मे महिन्यात एकास सहा होत्या, मात्र आता एकास अकरा किंवा बारा अशी करण्यात आली आहे.
संस्थात्मक अलगिकरण करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली आहेत. लॅब ची क्षमता वाढवली आहे, त्यामुळे लवकर निदान होत आहे ती औरंगाबादसाठी सुदैवाची बाब आहे. त्यात आता अँटीजन टेस्ट उपयोगी असून पाच हजार किट जिल्हाधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे.एक्सरे तपासणी वाढवल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहोत. मृत्यूचा दर जास्त आहे तो दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहेस, अशी माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांना नसेल पण आम्हाला लोकांची चिंता', जळगाव दौऱ्यादरम्यान फडणवीसांची टीका
कोरोनाच्या काळात उद्योग चालावे, असा प्रयत्न आहे. मात्र, आज परिस्थिती नियंत्रण करायला हवी, असे असले तरी काही आवश्यक उद्योगांना मान्यता आहे. यापुढे लॉकडाऊनची गरज पडणार नाही. त्यासाठी लॉकडाऊनचे कडक पालन करा, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना केले. लक्षण सौम्य असतानाच उपचार सुरू केल्यास रुग्ण बरे होण्याची संख्या वाढेल. त्यामुळे जास्तीत जास्त तपासणी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
नाईलाजास्तव औरंगाबाद शहरात लॉकडाऊन करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केल्याने निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये साखळी तुटली तर आपण कोरोनामुक्त होऊ शकतो. शहरात येणाऱ्या सहा ठिकाणी अँटीजन तपासणी करण्यात येईल. एका तासात अहवाल आल्यावर कुठलीही जोखीम नसली तरच शहरात त्यांना सोडण्यात येईल. औषधी पुरवठा आणि इतर बाबीचा अहवाल घेतला असून हा कडक लॉकडाऊन आहे. तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यायला हवा, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.