औरंगाबाद विवाहबाह्य संबंधांतून महिलेची हत्या झाल्याची घटना ताजी असताना कामावरून कमी केल्याचा राग धरून संतप्त ड्रायव्हरने उद्योजक संजय नागरे sword attack on businessman Sanjay Nagare यांच्यावर तलवारीने वार करून मारण्याचा प्रयत्न driver sword attack on owner केला. मात्र मुलाने वेळीच त्याचा हात पकडल्याने मोठी हानी टळली. ही थरारक घटना सिडको एन ३ भागात घडली. terminated driver tried to sword attack
मुलाने हाताने रोखला तलवारीचा वार बबन ऊर्फ पाटलोबा बालाजी फड वय ५६ वर्षे राहणार आविष्कार कॉलनी मूळ गाव किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर असे हल्लेखोर चालकाचे नाव आहे. उद्योजक नागरे यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी कामाला होता. मात्र दारुचे व्यसन असल्याने नागरे यांनी त्याला काढून टाकले. याचा राग असल्यामुळे बुधवारी सायंकाळी त्याने तलवार घेऊन नागरे यांचे घर गाठले. त्यावेळी नागरे आपल्या दोन मुलांसह हॉलमध्ये बसलेले होते. तुला ठार मारतो तुकडे तुकडे करतो असे म्हणत बबन याने नागरे यांच्यावर वार केला. मात्र नागरे यांच्या मुलाने बबनचा हात धरल्याने ते वाचले.
आरोपी ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात ही माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना तोपर्यंत कळविण्यात आली. त्यांनी याच भागात गस्तीवरील पथकाला नागरे यांच्या घरी जाण्याचे आदेश दिले. पोलीस आले तेव्हा बबन हॉलमध्ये तलवारीसह उभा होता. आरोपीकडून तलवार मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागरे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा Sangli Murder Case अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा खून करून मृतदेह फेकला नदीपात्रात