ETV Bharat / city

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत येण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणीला सुरुवात - aurangabad municipal corporation alliance

औरंगाबादचे जिल्हापरिषद अध्यक्षपद आणि महानगर पालिकेच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सत्तेत स्थान मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटतोय. तर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाचा भाजपने राजीनामा दिला असून, त्यावर देखील काँग्रेसचा दावा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

congress claims to be deputy mayor in aurangabad
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत येण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
author img

By

Published : Dec 23, 2019, 8:27 PM IST

औरंगाबाद - राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने काँग्रेसला सत्तेत स्थान मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ संपला असून या पदावर आता काँग्रेसने दावा केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत येण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

औरंगाबादचे जिल्हापरिषद अध्यक्षपद आणि महानगर पालिकेच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सत्तेत स्थान मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटतोय. तर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाचा भाजपने राजीनामा दिला असून, त्यावर देखील काँग्रेसचा दावा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्षांपासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे. हेच समीकरण राज्यात अस्तित्वात आल्याने या ठिकाणीही जागावाटपाचा तिढा वाढणर आहे.

अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ संपल्याने आता स्वपक्षाचा अध्यक्ष होणार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर पाण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा देत भाजपने महानगर पालिकेतील युती तोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालिकेत उपमहापौर पदासह इतर पदांवर काँग्रेसकडून दावा करण्यात येतोय. तसेच यासाठी काँग्रेसकडून वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले. याबाबत शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केली नसली; तरीही काँग्रेसने डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील जिल्हापरिषदेत अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

Intro:राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने काँग्रेस पक्षाला सत्तेत स्थान मिळालं. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या जिल्हापरिषद अध्यक्ष पद आणि महानगर पालिकेच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सत्तेत स्थान मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटतोय.Body:औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ संपला असून अध्यक्ष पदावर आता काँग्रेसने दावा केला आहे. तर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाचा भाजपने राजीनामा दिला असून त्यापदावर देखील काँग्रेसने दावा केला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.Conclusion:राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणचे सत्ता समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत तशी मागील अडीच वर्षांपासून शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे. हेच समीकरण राज्यात अस्तित्वात आल आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेने अध्यक्षपद वाटून घेतलं होतं असा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून गेला जातोय. त्यामुळे अडीच वर्षांचा शिवसेनेचा काळ संपला असून आता आमचा अध्यक्ष होणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर पाण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा देत भाजपने महानगर पालिकेतील युती तोडल्याच जाहीर केलं. त्यामुळे महानगर पालिकेत उपमहापौर पदासह इतर पदांवर काँग्रेस पक्षाकडून दावा केला जातोय. इतकच नाही तर वरिष्ठ पातळीवर याबाबत बोलणी सुरू असल्याचं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आहे. याबाबत शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसतर्फे मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी दावे मात्र करायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील जिल्हापरिषदेत अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात ज्या पद्धतीने सत्तासंघर्ष सुरू झाला तसा काहीसा अनुभव औरंगाबादच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो यात शंका नाही.

Byte - अनिल पटेल - जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.