ETV Bharat / city

'ढ' आहेस असे म्हणत असल्याने प्राध्यापक वडिलांची अल्पवयीन मुलाकडून हत्या

author img

By

Published : Oct 18, 2021, 9:41 PM IST

Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST

घरात पिता व मुलांमध्ये सतत कडाक्याचे भांडण व्हायचे. तू ‘ढ’ आहेस. नापास होतोस. अभ्यास करत नाहीस. पुढे चालून करिअरच्या बाबत काय विचार केला, अशाप्रकारचे टोमणे शिंदे लगावायचे. त्यामुळे बालकाच्या मनात शिंदेंविषयी द्वेष निर्माण झाला होता.

सात किलोच्या डंबेल्सने
सात किलोच्या डंबेल्सने

औरंगाबाद- प्राध्यापक राजन शिंदेंच्या हत्येची गुंतागुंत सोडविण्यात अखेर आठ दिवसानंतर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलानेच पित्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलाने दिलेल्या कबुलीनंतर सुमारे ६० तासांनी विहिरीतून हत्येचे साहित्य काढण्यात आले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याची सायंकाळी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

बैठक खोलीत गाढ झोपेत असलेल्या प्राध्यापक शिंदेंच्या डोक्यात तब्बल सात किलोंचा डंबेल्स त्यांच्या मुलाने घातला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने चाकुने गळा चिरून त्यांच्या दोन्ही हातांच्या नसादेखील कापल्या होत्या. हा फटका इतका ताकदीने मारण्यात आला होता की, शिंदेंचा कानदेखील त्यामुळे कापला गेला. या हत्येनंतर अल्पवयीन मुलाने संपूर्ण रात्र जागून काढली. टॉवेलमध्ये डंबेल्स आणि चाकू गुंडाळून घरापासून अवघ्या शंभर फुटावर असलेल्या विहीरीत टाकले होते.

प्राध्यापक वडिलांची अल्पवयीन मुलाकडून हत्या

हेही वाचा-घरगुती वादातून पत्नीची हत्या करुन पतीने केली आत्महत्या

कडाक्याच्या भांडणानंतर थंड डोक्याने केला खून
गेल्या ११ ऑक्टोबर रोजी प्रा. शिंदे यांच्या हत्येची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. घरात पिता व मुलांमध्ये सतत कडाक्याचे भांडण व्हायचे. तू ‘ढ’ आहेस. नापास होतोस. अभ्यास करत नाहीस. पुढे चालून करिअरच्या बाबत काय विचार केला, अशाप्रकारचे टोमणे शिंदे लगावायचे. त्यामुळे बालकाच्या मनात शिंदेंविषयी द्वेष निर्माण झाला होता. त्या रात्रीदेखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर शिंदे हे मध्यरात्री दीडच्या सुमारास बैठक खोलीत झोपी गेले. मात्र, अल्पवयीन मुलगा जागीच होता. त्याची आई आणि बहीण एकीकडे टिव्ही पाहत होते. त्यावेळी हा अल्पवयीन मुलगा ‘मर्डर मेस्ट्री’ ची सिरीज मोबाइलवर पाहत होता.

हेही वाचा-तिरुपती ट्रस्टच्या नावाखाली गुजरात येथील व्यक्तीला पावणेतीन कोटीचा गंडा

पित्याच्या हातांच्या दोन्ही नसा कापल्या-

घरातील सर्वजण झोपल्यानंतर अल्पवयीन मुलाने गाढ झोपेत असलेल्या शिंदे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला डंबेल्सने वार केला. त्यानंतर स्वयंपाक खोलीतून भाजी कापण्याचा चाकू आणत बालकाने सुरुवातीला गळा चिरला. त्यानंतर शिंदे यांच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस घरानजीक असलेल्या विहीरीतील पाण्याचा उपसा करून हत्यारांचा शोध घेत होते. सोमवारी दुपारी हत्यारे शोधण्यात यश आल्याचे पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा-समोसा तळताना किळसवाणा प्रकार; मराठा एकीकरण समितीची पोलिसांकडे धाव

हत्यारे केली हस्तगत-
पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, ब्रम्हा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, अनिता फासाटे, गुळवे, अमोल म्हस्के, पवन इंगळे व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र अथक प्रयत्न करून तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यामुळे रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये गुंडाळलेला डंबेल्स आणि चाकू विहिरीत काढण्यात यश आले.

विहिरीतून ६० तास काढले पाणी
प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांचा शोध घेतला. यावेळी तपासातून मिळालेल्या माहितीनुसार घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहीरीत वापलेली हत्यारे टाकण्यात आली होती. वापरात नसलेल्या विहिरीतून साहित्य काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जुन्या विहीरीत पाणी काढल्यानंतर झरे मोकळे झाल्याने विहीरीत पाणी वाढू लागल्याने पोलिसांना मोटारीदेखील वाढवाव्या लागल्या. तब्बल ६० तासांच्या प्रयत्नांनी वापरलेले डंबल्स, चाकू व टॉवेल पोलिसांच्या हाती लागले.

घरात वैचारिक मतभेद-
तू 'ढ' आहेस, असे नापास होतो. अभ्यास करत नाहीस, पुढे चालुन करिअरच्या बाबत काय विचार केला आहे, अशाप्रकारचे टोमणे शिंदे लगावायचे. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या मनात पित्याबद्दल द्वेष निर्माण झाला होता.

दरम्यान, प्राध्यापक राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात कार्यरत होते. 11 ऑक्टोबरला राहत्या घरात गळा चिरून त्यांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती.

Last Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.