ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder : लुटमाराची घटना नाही; उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे कारण आले समोेर - MP Ravi Rana

अमरावती शहरातील उमेश कोल्हे या मेडिकल व्यावसायिकाची हत्या ( Umesh Kolhe Murder ) लुटमारीसाठी झालेली नाही. त्यांच्या हत्येची केंद्रिय तपास यंत्रणाकडून चौकशी ( Inquiries from central agencies ) करावी अशी मागणी नवनित राणा यांचे पती खा. रवि राणा ( MP Ravi Rana ) यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात त्याच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Umesh Kolhe Murder: No incident of robbery; The motive behind Umesh Kolhe's murder is still unclear
लुटमाराची घटना नाही; उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे कारण अद्याप अपष्ट
author img

By

Published : Jul 2, 2022, 3:26 PM IST

Updated : Jul 2, 2022, 4:26 PM IST

अमरावती - उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder ) लुटमारीसाठी झाल्याचे दिसून येत नाही. आरोपीने लुटमारीसाठी चाकूचा वापर केला असता, तर तो त्याच्याकडील सामान व पैसे घेऊन पळून गेला असता. शिवाय या खून प्रकरणात पकडलेले आरोपींची पूर्वी कुख्यात म्हणून ओळख पटलेली नाही. मोठ्या चायनीज चाकूने त्याच्या गळ्यात वार करण्याऐवजी त्यांनी भीतीपोटी पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, ही हत्या लुटमारीसाठी झालेली नाही त्यामुळे केंद्रिय यंत्रणांच्याकडून चौकशी करण्याची मागणी रवी राणा ( MP Ravi Rana ) यांनी केला आहे.

केंद्रिय यंत्रणांच्याकडून चौकशीची मागणी - कोल्हे यांच्या कुटुंबीयांनीही या घटनेबाबत सांगताना याच गोष्टी नमूद केल्या आहेत. या घटनेसंर्दभात त्यामुळे हा खून लुटमारीच्या कारणामुळे झाला असे नाही. खा. नवनीत राणांचे पती रवी राणा यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपींनी पैसे चोरण्यासाठी हे कृत्य केल्याचे दिसत नाही असे राणा म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद (२४) रा. मौलाना आझाद कॉलनी, मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम (२२) रा. बिसमिल्लानगर, शाहरूख पठाण हिदायत खान (२४) रा. सुफियाननगर, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम (२४) रा. बिसमिल्लानगर व शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२) रा. यास्मीननगर यांना अटक करण्यात आली आहे.

तपास एनआयएने करावा - आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे कुठून फोन आले ?अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता हा तपास एनआयएने ( National Investigation Agency ) तपास करावा अशी विनंती भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

हेही वाचा - Medical Professionals Murder : मेडिकल व्यावसायिकाची निघृर्ण हत्या, नुपूर शर्मा प्रकरणाचा संशय?

Last Updated : Jul 2, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.