ETV Bharat / city

उमेश कोल्हे हत्या प्रकरण; आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एनआयए अमरावतीत - उमेश कोल्हे हत्या प्रकरण एनआयए चौकशी

अमरावती शहरातील ( NIA in amravati news ) औषधी विक्रेते उमेश कोल्हे ( Umesh Kolhe murder case ) हत्या प्रकरणातील सात आरोपींना अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी एनआयएचे ( NIA in amravati news ) पथक शहर कोतवाली पोलीस ठाण्यात ( Umesh Kolhe murder case accuse ) दाखल झाले आहे.

Umesh Kolhe murder case NIA enquiry
उमेश कोल्हे हत्या प्रकरण आरोपी
author img

By

Published : Jul 5, 2022, 2:23 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील ( NIA in amravati news ) औषधी विक्रेते उमेश कोल्हे हत्या ( Umesh Kolhe murder case ) प्रकरणातील सात आरोपींना अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी एनआयएचे पथक ( NIA in amravati news ) शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. कोल्हे कुटुंबातील एक सदस्य देखील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात उपस्थित असून सध्या एनआयए ( Umesh Kolhe murder case accuse ) शहर कोतवाली पोलिसांसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांकडून महत्वपूर्ण माहिती घेत आहे.

माहिती देतना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांना धमकी; ऑडिओ क्लिप आली समोर

आरोपींना आठ जुलैला एनआयए न्यायालयासमोर हजर करणार - औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट शेख इरफान शेख रहीम याने रचला होता. अमरावती पोलिसांनी या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम याच्यासह डॉक्टर युसुफ खान, शोएब खान, मूदलिस अहमद, अतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण, शेख इब्राहिम अशा सात जणांना अटक केली आहे. या सर्व सात जणांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनआयएने या सातही आरोपींना आपल्याकडे सुपूर्द करावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या सातही आरोपींना एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत. आठ जुलै पर्यंत हे सातही आरोपी एनआयएच्या कस्टडीत राहणार असून, आठ जुलैला त्यांना मुंबई येथील एनआयए च्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज या सातही आरोपींना एनआयएचे पथक मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना एनआयएचे पथक आज मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असून, यासाठी पोलिसांची मोठी व्हॅन शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात सज्ज आहे. आरोपींना शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर काढताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.

असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.

दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी साधला डाव : उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारा त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहचताच त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने लगतच्या खासगी रुग्णालयात उमेश कोल्हे यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्शन : नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जिवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली आहे. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का? याचा तपास देखील केला जाणार आहे.

हेही वाचा - Threats From The Doctor : नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या डॉक्टरला डॉक्टरकडूनच धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.