ETV Bharat / city

अमरावतीत आमदार सुलभा खोडके यांच्या शेतात गौण खनिजांची चोरी - amravati latest news

आमदार सुलभा खोडके यांच्या शेतात गौण खनिजांची चोरी होत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. (आज) शनिवारी सकाळी गौण खणीच चोरी करणाऱ्यांना मुद्देमलासह ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली.

गौण खनिजांची चोरी
गौण खनिजांची चोरी
author img

By

Published : Dec 19, 2020, 3:34 PM IST

अमरावती - आमदार सुलभा खोडके यांच्या शेतात गौण खनिजांची चोरी होत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. सुलभा खोडके यांचे छत्री तलाव मागील कंवरधाम परिसरासमोर शेत आहे. या शेतामध्ये गौण खनिज चोरी होत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी गौण खणीच चोरी करणाऱ्यांना मुद्देमलासह ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली. महसूल आणि पोलीस प्रशासने ही संयुक्त कारवाई केली आहे.

अमरावतीत गौण खनिजांची चोरी

तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टर जप्त-

याप्रकरणी आमदार सुलभा खोडके यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके तोंडी तक्रार दिली होती. त्यानुसार तहसीलदार संतोष काकडे, बडनेराचे ठाणेदार पंजाब वंजारी यांच्या नेतृतवात तलाठी तसेच पोलीस खोडके यांच्या शेतात धडकले. यावेळी शेतात तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टरमध्ये गौण खनिज भरलेले आढळून आले. तर तीन ते चार ट्रक पळून गेलेत. पोलिसांनी तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टर जप्त करून बडनेरा पोलीस ठाण्यात जमा केले. आज (शनिवारी) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

15 जणांना घेतले ताब्यात-

शेतात गौण खनिजांची चोरी करताना एकूण 15 जणांना बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी 10 मजूर तर 5 वाहन चालक आहेत.

महसूल प्रशासन देणार तक्रार-

याप्रकरणात शेत मालक खोडके यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र महसूल प्रशासनाच्यावतीने या प्रकरणात तक्रार दिली जाणार आल्याची माहिती ठाणेदार पंजाब वंजारी यांनी दिली. महसूल प्रशासनाच्या वतीने तक्रार दिल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा- भारताचा फक्त ३६ धावात धुरळा, ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, हेझलवुड-कमिन्स ठरले नायक

हेही वाचा- आघाडीत बिघाडी? सोनियांचे उद्धवना प्रथमच पत्र, कॉंग्रेस मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.