ETV Bharat / city

Amravati violence : अमरावती शहराला पोलीस छावणीचे स्वरूप, दिवसभराच्या हिंसाचारानंतर शहर शांत

author img

By

Published : Nov 13, 2021, 10:31 PM IST

त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत (Amravati violence) काल दुपारी एका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज (दि.13) भाजपकडून अमरावतीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळाले. दिवसभर शहरात भीतीचे वातावरण असताना दुपारी शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून (Maharashtra police) परिस्थितीवर नियंत्रण संतप्त जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात आणि शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दिवसभराच्या हिंसाचारानंतर सायंकाळी अमरावती शहर शांत झाले आहे.

Amravati violence
Amravati violence

अमरावती - त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत (Amravati violence) काल दुपारी एका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज (दि.13) भाजपकडून अमरावतीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळाले. दिवसभर शहरात भीतीचे वातावरण असताना दुपारी शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून (Maharashtra police) परिस्थितीवर नियंत्रण संतप्त जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात आणि शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप ( police force in Amravati ) आले आहे. दिवसभराच्या हिंसाचारानंतर सायंकाळी अमरावती शहर शांत झाले आहे.

अमरावती शहराला पोलीस छावणीचे स्वरूप, दिवसभराच्या हिंसाचारानंतर शहर शांत

शहर बंदला लागले हिंसेचे गालबोट

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि डॉ. अनिल बोंडे यांच्यासह महापौर चेतन गावंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय आणि जयंत डेहनकर यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे शुक्रवारी शहरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शहर बंदचे आवाहन यावेळी करण्यात आले असतानाच भाजप युवा मोर्चाच्या वतीने अंबापेठ परिसरात दगडफेक करण्यात आली. यानंतर शहर बंदला हिंसेचे गालबोट लागले आणि काही क्षणातच अंबापेठ, प्रभात चौक, चित्रा चौक, सक्करसात, हर्षराज कॉलनी, कठोरा नाका, रवीनगर या भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

हिंसाचार दरम्यान पोलीस कर्मचारी जखमी

शहरातील अंबापेठ नमुना परिसर, गांधी चौक, प्रभात चौक, चित्रा चौक या परिसरात हिंसाचाराला आळा घालताना जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. जमावाच्या हल्ल्यात सचिन लाकडे, अभिजीत भारुडकर, जमील अहमद हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन गटामधील हाणामारीत दरम्यान संदीप मंगळे नामक व्यक्तीला हातावर तलवार लागल्याने तेही गंभीर जखमी झाले. गांधी चौक परिसरात पोलिसांनी सोडलेले अश्रू नळकांडे एका युवकाने हातात झेलताच त्याच्या हाताला गंभीर इजा झाली.

नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांच्याकडे पोलीस आयुक्तांचा चार्ज

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह आणि जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना सुट्टीवर असल्यामुळे शनिवारी दुपारी नागपूर येथील गडचिरोली नक्षली सेलचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांच्याकडे अमरावती पोलीस आयुक्तांचा सुत्रे देण्यात आली. अमरावती शहरातील परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त आरती सिंह या सुट्टी रद्द करून रविवारी (दि. 14) अमरावतीत परतणार आहे. आज शहर पोलिसांसोबतच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

अतिरिक्त पोलीस महासंचालक येणार अमरावतीत

अमरावती शहरात घडलेल्या टनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरावतीत येणार आहे. यासह नागपूर येथील शंभर पोलिसांची एक तुकडी अमरावतीत पोहोचली आहे. शहरातील राजकमल चौक, चित्रा चौक, पठाण चौक, गांधी चौक, नमुना परिसर, मसान गंज या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासह शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हे ही वाचा - Amravati violence : अमरावतीत कलम 144 लागू, इंटरनेट सेवा केली बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.