अमरावती - अफाट मेहनत करण्याची जिद्द असली की खडतर मार्गातूनही राजमार्ग तयार करता येतो. असे एक न अनेक उदाहरणे आहेत. संत्रा बागा पिकत नाही म्हणून हताश झालेले शेतकरी आपल्या नागपुरी संत्राच्या बागा तोडून उध्वस्त करत असल्याच चित्र सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. (Amravati District Produced 1 Crore From The Orange Crop) परंतु, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील टेम्बुरखेडा गावातील गोपाल उमेकर व स्वप्निल उमेकर या दोन उच्चशिक्षित भावंडांनी मात्र अफाट मेहनतीच्या जोरावर गावापासून ६० किलोमीटरवर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ७ वर्षांपूर्वी ५० एकर पडीत जमीन विकत घेउन त्या ठिकाणी ७ किलोमीटर वरून पाणी आणून तब्बल ६ हजार झाडांची संत्रा बाग फुलवली आहे. जिद्द, जिकाटी आणि उत्तम नियोजनातून पहिल्याच वर्षी या उच्चशिक्षित तरूण भावंड असलेल्या शेतकऱ्यांनी २०-३० लाख नव्हे तर तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांचा मृग बहारातील संत्रा विकला आहे.
एकूण सहा हजार संत्रा झाडांची लागवड केली
गोपाल उमेकर आणि स्वप्नील उमेकर या दोन उच्चशिक्षित भावंडांनी सात वर्षापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील इंदरमारी गावानजीक एकाच ठिकाणी पन्नास एकर पडीत जमीन खरेदी केली होती. (Orange orchard in Ashti Taluka Of Amravati District) पूर्वी या जमिनीवर कमरे एवढे गवत वाढले होते. हा परिसर कोरडवाहू असल्याने इथे कुठलेच उत्पादनही घेता येत नव्हते. परिसरात पाण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने अनेक वर्षांपासून ही जमीन अशीच पडीत होती. परंतु, स्वप्नील उमेकर आणि गोपाल उमेकर यांनी ही पडीत जमीन खरेदी केल्यानंतर या ठिकाणी यशस्वी शेती करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शेती बरोबरच विविध प्रयोग करण्याचाही त्यांनी निर्धार केला. या भागात संत्रा बागा नाहीत. (Orange orchard of 6,000 trees) परंतु, संत्रा बाग फुलवण्याचे स्वप्न त्यांनी उराशी धरले. यासाठी त्यांनी सर्वप्रथम सात किलोमीटरवरील किन्हाळा गावानजीक एका शेतातून विहीर आणि बोरवेल खोदून त्या ठिकाणाहून पाइपलाइन टाकून आपल्या शेतामध्ये पाणी आणले. त्यानंतर पहिल्या टप्यात दोन हजार दुसऱ्या टप्यात दोन हजार आणि तिसऱ्या टप्यात दोन हजार अशी एकूण सहा हजार संत्रा झाडांची लागवड केली होती.
वर्षभराचा खर्च जवळपास 30 लाख
सहा वर्षे अफाट मेहनत घेतल्यानंतर आता त्यांची हिरवीगार संत्रा बाग उभी राहिली आहे. या वर्षी मृग बहाराच्या संत्रा एक महिना अगोदरच आला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारा मृग बहाराच्या संत्रा मात्र यावर्षी जानेवारीतच तोडनीला आला आहे. त्यात संत्राची गुणवत्ता चांगली असल्याने व बाजारभाव देखील समाधानकारक असल्याने पहिल्याच वर्षी त्यांनी तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांचा संत्रा नांदगाव पेठ येथील व्यापाऱ्यांना विकला आहे. (Orange Orchard In Amravati District ) वर्षभराचा खर्च जवळपास 30 लाख आला असून एक कोटी वीस लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे.
कृषी विभागाचे मिळते वेळोवेळी मार्गदर्शन
स्वप्निल उमेकर आणि गोपाल उमेकर हे उच्चशिक्षित तरुण शेतकरी नेहमी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत असतात. रासायनिक शेतीपेक्षा सर्वाधिक भर त्यांचा नैसर्गिक शेतीकडे आहे. थोड्या प्रमाणात ते रासायनिक शेती करतात सोबतच कृषी विभागाचे ही त्यांना मोठे मार्गदर्शन मिळत असते. येथील कृषी सहाय्यक अमोल सोनटक्के नेहमी शेतात जाऊन त्यांना विविध मार्गदर्शन करते. तसेच, विविध योजनेची माहिती त्यांना देत असते. ही संत्रा बाग सध्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. यापूर्वी वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही या संत्रा बागेला भेट दिली होती. यावेळी या तरुण शेतकऱ्याचे त्यांनी भरभरून कौतुकही केले होते.
उमेकर यांच्या शेतातील संत्रा हा सर्वाधिक नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. तसेच, संत्राचा दर्जा व गुणवत्ता ही चांगली असल्याने या संत्र्याला मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. बांगलादेश पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश मुंबईतही हा संत्रा विकायला नेत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. दररोज चार गाडी संत्रा हा विविध बाजारपेठेमध्ये सध्या विकायला नेत आहे. दहा दिवस या शेतातील संत्रा तोडण्याचे काम चालणार आहे. तसेच, यापूर्वी एक कोटी रुपयांचा आम्ही संत्रा बगीच्या खरेदी केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा एवढ्या महाग दीड कोटींचा संत्रा बगीच्या आम्ही उमेकर यांचा खरेदी केला असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
एक भाऊ चार्टर अकाउंटंट तर दुसरा सिव्हिल अभियांत्रिकी
हे दोन्ही शेतकरी भावंड उच्चशिक्षित आहे गोपाल उमेकर यांनी चार्टर अकाउंटंटचे शिक्षण घेतले आहे. तर, स्वप्नील उमेकर याने सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. परंतु, कुठेही दुसऱ्याकडे नोकरी न करता त्यांनी आपली शेती करण्याचा निर्णय घेत निर्णय घेतला आहे. आणि याच शेतीत ते आता यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. इतर तरुणांनीही नोकरी लागली नाही म्हणून हताश न होता नियोजबद्द शेती करावी असा सल्ला ते देतात.
संत्रा बागेला पाणी देण्याची पद्धत वेगळी
हल्ली संत्रा बागांना पाणी देताना शेतकरी वाफा पद्धती किंवा पट पद्धतीने संत्रा झाडांना पाणी देत असतात. परंतु, उमेकर यांच्याकडे एकूण सहा हजार संत्राची झाडे आहेत. त्यामुळे वाफा पद्धतीने किंवा पट पद्धतीने पाणी देणे शक्य होत नाही म्हणून बाराही महिने ते ठिबक पद्धतीने आपल्या झाडांना पाणी देतात. रासायनिक खतांपेक्षा त्यांनी शेणखतावर देखील भर दिला आहे.
हेही वाचा - दुसऱ्याची काम स्वतःच्या नावावर खपवणे हा 'पराक्रम' नाही;सामनातून मोदी सरकारचा समाचार