ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हेंच्या हत्येसाठी आरोपींना दहा हजार रुपये; पोलीस आयुक्त सिंह

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Umesh Kolhe Murder Case ) प्रत्येक आरोपीला दहा हजार रुपये दिले होते. मुख्य आरोपीने हे पैसै दिले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त सिंह यांनी ( Police Commissioner Aarti Singh ) दिली आहे.

aarti singh
aarti singh
author img

By

Published : Jul 4, 2022, 7:20 PM IST

Updated : Jul 4, 2022, 8:16 PM IST

अमरावती - औषध विक्रेते उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ समाज माध्यमांत पोस्ट केल्याने कोल्हेंची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. उमेश कोल्हे हत्यप्रकरणात रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या हत्येचा कट शेख इरफान शेख रहीम याने रचला होता. या कृत्यासाठी त्याने हत्येत सहभागी असलेल्या सहा जणांना दहा हजार रुपये दिले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह ( Police Commissioner Aarti Singh ) यांनी दिली आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

आरती सिंह म्हणाल्या की, उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या झाली. त्याच दिवशीपासून आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. या प्रकरणात कोणाला कुठलीच धमकी मिळाली नव्हती. हत्येच नेमके कारण सुद्धा कळणे कठीण होते. सारं काही अंधारात असताना देखील आम्ही या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे हत्याकांड नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळेच झाल्याचे आम्हाला पहिल्याच दिवशी लक्षात आले. पण, शहरातील वातावरण खराब होऊ नये याची खबरदारी घेत, देश हित लक्षात घेऊन हे गंभीर प्रकरणांनी अतिशय संवेदनशील रित्या हाताळले, असेही आरती सिंह यांनी स्पष्ट केलं.

पोलीस आयुक्त आरती सिंह प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

"तिघांना धमकी मात्र तक्रार नाही" - समाज माध्यमावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या शहरातील तीन व्यक्तींना धमकवण्यात आलं आहे. त्यांना धमकाविण्याची ऑडिओ क्लिप देखील सर्वत्र व्हायरल झाली आहे. असे असताना तिघांपैकी कोणीही तक्रार देण्यास समोर आले नाही. आम्ही तिनही व्यक्तींच्या घरी जाऊन आलो. मात्र, आम्हाला तक्रार द्यायची नाही, असेच त्यांचे म्हणणे होते. आम्ही समजूत घातल्यामुळे केवळ एका व्यक्तीने हा प्रकार घडला, असे सांगितल्याचं आरती सिंह म्हणाल्या.

"तपास एनआयएकडे" - आरती सिंह यांनी पुढ म्हटलं, या प्रकरणाचा तपास सध्या घडीला आमच्याकडे आहे. मात्र, आज रात्री किंवा उद्या सकाळी या संपूर्ण प्रकरणाचा तपास आम्ही एनआयएकडे सुपूर्द करणार आहोत. हे प्रकरण आता एनआयए हाताळणार असले तरी या प्रकरणातील आठव्या आरोपीला अटक करण्याची जबाबदारी आमची आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांची जी काही मदत लागेल ती एनआयएला केली जाईल.

"...म्हणून खासदारांचा रोष" - अमरावती महापालिकेच्या आयुक्तांवर शाही फेक केल्याप्रकरणात आमदार रवी राणा यांच्या विरोधात आम्ही कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळेच खासदार नवनीत राणा यांचा माझ्यावर वैयक्तिक रोष असून हे प्रकरण मी दाबत आहे, असा बिन बुडाचा आरोप त्यांनी केला आहे. हे प्रकरण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे हाताळले आहे. माझ्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी वरिष्ठांना पत्र देऊन जे काही आरोप केले आहे त्यात काही एक तथ्य नाही. उदयपूर येथे जी काही घटना घडली, त्यामध्ये व्हिडिओ क्लिप समोर आली होती. अमरावतीच्या घटनेत मात्र कुठलेच धागेदोरे नसताना आम्ही या संपूर्ण प्रकरणात सात जणांना अटक केली. या प्रकरणासंदर्भात आम्ही माध्यमांना ही माहिती दिली नाही आणि असे करणे अतिशय महत्त्वाचे होते. पण, कोणाच्यातरी दबावामुळे किंवा पोलीस आयुक्तांनी वैयक्तिकरित्या हे प्रकरण दडपण्याचा नवनीत राणांचा आरोप चुकीचा असल्याचेही आयुक्त आरती सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

सात आरोपींना ट्रान्झिड रिमांड - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सात आरोपींना अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची रिमांड ट्रान्झिट रिमांड सुनावली आहे. तसेच, अमरावती पोलीस सर्व आरोपींना 8 जुलै रोजी अथवा त्यापूर्वी एनआयएच्या मुंबई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • Maharashtra | Umesh Kolhe murder case: All 7 accused granted 4-days transit remand after being produced before the Amravati court.

    Amravati Police to present all accused before NIA's Mumbai court on or before July 8.

    — ANI (@ANI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Umesh kolhe Murder Case : नवनीत राणांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप; आरती सिंह म्हणाल्या, 'माझ्यासह अमरावती...'

Last Updated : Jul 4, 2022, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.