अमरावती - शहर आणि जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने शहर आणि जिल्ह्यातील मंदिरही बंद आहेत. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर शहरालगत असणारे कोंडेश्वर, गडगडेश्वर, तापोवनेश्वर आणि महादेव खोरी हे सर्व मंदिर भाविकांसाठी बंद होते. मंदिर बंद आतांनाही काही भाविक मंदिर दर्शनाला आले आणि त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नसताना त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर डोकं टेकवूनच महादेवाला नमस्कार केला.
हेही वाचा - हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त देशातील 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच क्लिकवर
पहाटे पार पडला धार्मिक विधी
गर्दी होऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर बंद असले तरी मंदिरातील पुजारी आणि विषवस्थ मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन पहाटे धार्मिक विधी पूर्ण केला. कोंडेश्वर मंदिराच्या गाभारा पिवळ्या रंगांच्या फुलांनी सजवले होते.
यात्रा मार्गावर शुकशुकाट
कोंडेश्वर मंदिराकडे जाताना अमरावती-बडनेरा मार्गापासूनच मोठी गर्दी होते. महामार्गापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या मंदिराकडे महाशिवरात्रीच्या पर्वावर जाताना दीड ते दोन तास लागतो इतकी गर्दी असते. आज मात्र कोंडेश्वर यात्रा मार्गावर शुकशुकाट होता.
मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असताना मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
मंदिर बंद तरी काही भाविक फिरकलेच
कोरोनामुळे मंदिर बंद असताना काही भाविक मात्र होईल दर्शन अशी आशा बाळगून मंदिर परिसरात फिरकलेच. पोलिसांनी ' विनाकारण आले तुम्ही घरीच थांबायचं' असं म्हणत भाविकांना चार-चारच्या गटात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास परवानगी दिली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा करणारे कोल्हापुरातले अनोखे गाव