अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे दोघेही शनिवारी ( 23 एप्रिलला ) मुंबईतील मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करणार आहेत. अमरावतीवरून राणा दाम्पत्य मुंबईसाठी 22 एप्रिलला कार्यकर्त्यांसह रवाना होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. हनुमान चालीसा पठणाच्या ( Hanuman Chalisa ) मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Hanumam Chalisa Statement ) यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा ( Shivsainik Agitation At Ravi Rana Home ) काढला होतो. त्यानंतर आता राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी ( Chief Minister Matoshri Residence ) जावून हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती आमदार रवी राणांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना केले होते आवाहन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या पर्वावर मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करावे, असे आवाहन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिले होते. हनुमान जयंतीला मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाही, तर आम्ही स्वतः मुंबईला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करू, असे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी म्हटले होते. आज आमदार रवी राणा यांनी आम्ही 23 एप्रिलला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे घोषित केले आहे. आमच्यासोबत आमचे हजारो समर्थक सुद्धा 23 एप्रिलला मातोश्रीवर जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
हनुमान जयंतीला केले हनुमान चालीसा पठण : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरातील साईनगर परिसरात खंडेलवाल लेआउट येथील पगडीवाले हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले होते. हनुमान जयंतीच्या पर्वावर आमदार रवी राणा यांच्यावतीने शंभर ठिकाणी भोंगेही वितरीत करण्यात आले होते. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन दिले असताना आणि थेट मातोश्रीवर धडक देण्याचा इशारा दिला असल्यामुळे अमरावतीत शिवसैनिक संतप्त झाले होते. शिवसैनिकांच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या घरावर मोर्चाही काढण्यात आला होता.
हेही वाचा - डॉ. अनिल बोंडे यांना मानसोपचाराची गरज; काँग्रेसने रूग्णालयात केली नोंदणी