ETV Bharat / city

Krishna Janmashtami 2022 भागवान श्रीकृष्णाने महाराष्ट्रतील या गावातुन केले होते रुक्मीणीचे हरण

author img

By

Published : Aug 17, 2022, 5:03 PM IST

भगवान श्रीकृष्णांचे तत्वज्ञान जगभर परिचित आहे. या भगवान श्रीकृष्णांची 18 ऑगस्ट ही जन्माष्टमी Krishna Janmashtami आहे. कृष्णधर्मातील परंपरेनुसार कृष्णाला स्वयंम भगवान, सर्वोच्च मानतात. श्रीकृष्णाने Lord Krishna abducted Rukmini महाराष्ट्रातील कौंडण्यपूर Kaundanyapur येथुन त्याकाळी रुक्मीनीला पळवुन नेले आणि नंतर तीच्याशी विवाह केला. जाणुन घेऊया या कौंडिण्यपूर चे महत्व.

Krishna Janmashtami 2022
कौंडिण्यपूर

अमरावती पुराणातील उल्लेखाप्रमाणे अमरीश ऋषी चे पुत्र कौडीण्य या नावावरून कुंडीनपूर आणि पुढे कुंडीलपूर नगरी असे नाव पडले. कौंडिण्यपूर हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणीचे माहेर होते. एवढेच नाही तर रामांची आजी, अगस्तींची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर कौंडिण्यपूर Kaundanyapur होते. नल व दमयंतीचा विवाह देखील येथेच झाला होता. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने Lord Krishna abducted Rukmini रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका आहे.

श्रीकृष्णाने जेथुन रुक्मिणीचे हरण केले असे कौंडिण्यपूर देवस्थान

रुक्मिणीचे माहेर अमरावती जिल्ह्यात विदर्भ अर्थात वर्धा नदीच्या काठावर वसलेले पौराणिक ठिकाण अर्थात कौंडिण्यपूर. हे फार पूर्वी विदर्भाच्या राजधानीचे ठिकाण होते. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी माता रुक्मिणीचे कौंडिण्यपूर हे माहेर असल्याचा उल्लेख पुराणात आहे. 1928 पासून कौंडिण्यपूर येथे पुरातन वस्तू संशोधन सुरू असून, आजवर या परिसरात मिळालेल्या पुरातन वस्तू, शिल्प याद्वारे हा परिसर पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. येथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. या दिंडीला ४०० हून अधिक वर्षांची जुनी परंपरा आहे.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

कौंडिण्यपूरचे तीर्थ महात्म्य पुराणातील उल्लेखा प्रमाणे अमरीश ऋषींचे पुत्र कौडीण्य व त्यांच्या नावावरून कुंडीनपूर आणि पुढे कुंडीलपूर नगरी असे नाव पडले. प्रभू रामचंद्रांचे आजी आणि राजा दशरथांची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा, भागीरथ राजांची माता केशींनी यांचे माहेर आणि नाथ संप्रदायातील चौरंगी नाथाचा जन्म कौंडण्यपूर येथेच झाला. भीष्मक राजाची सुकन्या रुक्मिणी मातेचे जन्म ठिकाणही श्रीक्षेत्र कौंडिण्यपूरच आहे. येथे भगवान श्रीकृष्णाने या माता रुक्मिणीचे हरण केले होते.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर कौंडिण्यपूर येथे वर्धा नदीच्या काठावर विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर अस्तीत्वात आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार वेळोवेळी झाल्याचे दिसून येते. गाभाऱ्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्ती आहे. विठ्ठलाचा अवतार अर्थात श्रीकृष्ण हे कौंडिण्यपूरचे जावई घरी आल्यामुळे भिमक राजाच्या कुटुंबातील काही लोक या विठ्ठल रुक्मिणीबरोबर शेजारी उभे आहेत, असे गाभाऱ्यातील मूर्ती पाहून जाणवते.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

दहा हजार वर्षांपूर्वीची स्थापना 1928 पासून कौंडिण्यपूर येथे उत्खनन तसेच इतर काम करत असणाऱ्या भारतीय संशोधन पुरातत्व विभागाला या ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती सापडली. समुद्रात शेषनागावर विश्राम करीत असलेले भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाशी असणारी माता लक्ष्मी, यासह काही देवतांच्या मुर्त्या देखील काळा पाषाणावर कोरण्यात आल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यालगतच विष्णूची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

उत्खनन आणि संशोधन कौंडिण्यपूर येथे 1928 मध्ये भारतीय संशोधन पुरातत्व विभागाच्या अरा देशपांडे यांनी या भागात उत्खनन केले. तसेच 1936 मध्ये पुरातत्त्व विभागाचे प्रमुख रायबहादूर दीक्षित यांनी देखील या परिसरात संशोधन केले. यानंतर 1962 मध्ये पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी या भागात उत्खनन आणि अभ्यास केला. या भागात उत्खन्नात मिळालेल्या वस्तूंवरून, या वस्तू ताम्र आणि पाषाण युगातील असाव्यात असा अंदाज लावण्यात येतो. सातवाहन काळातील काही नाणी व मातीची भांडी उत्खननात मिळाली आहेत. याच भागात टेकड्यांवर मोठ मोठ्या इमारती, महल असल्याच्या खुणा ही आढळल्या आहेत. पाऊस पडल्यावर या परिसरात अनेक ठिकाणी पुरातन वस्तू सापडतात. या ठिकाणी आढळून आलेल्या वस्तू पुण्याच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. या परिसरात आणखी संशोधनाची गरज आहे.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

वाकाटकांची होती सत्ता कौंडिण्यपूर ला युगायुगाचा इतिहास राहीला आहे. कुडीन किंवा कवडीन्य या नावाच्या ऋषीचे नाव या गावाने घेतले असले तरी, अनेक राजवटी या नगरीने पाहिल्या आहेत असे दिसून येते. तिसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत वाकाटकांची सत्ता देखील कौंडिण्यपूर्व होती. संपन्न जीवनाचे एक नवे दर्शन या काळात विदर्भाला घडले. विदर्भाच्या ऐश्वर्याचा ओघ पुढे पैठणला गेला, असे इतिहासकार सांगतात. कौंडिण्यपूर आणि पैठण या दोन्ही महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजधानी होत्या, असे देखील इतिहासकारांचे म्हणणे आहे.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

प्राचीन साहित्यात उल्लेख कवडण्यपूर अर्थात कुंडीनपूर चा उल्लेख फार प्राचीन काळापासून निरनिराळ्या ग्रंथात आढळतो. विदर्भातील कुंडीनपूर नगरी रामायण काळापासून प्रसिद्ध असून, महाभारतातील कालखंडात भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण कुंडीनपूरहून केल्याचे विख्यात आहे. यादरम्यानच्या काळातील कुंडीत पुराची वंशावळ भागवत व हरिवंश या ग्रंथात दिली आहे. या वंशात भीम, दक्ष, बानू, हलदर, सुनील, पद्माकर, रिपोवर्धन, चित्रासेन, रुखमांगत, भीम, दम, भोज, आदी प्रसिद्ध राजे या परिसरात राज्य करीत होते, असा उल्लेख सापडतो. भीष्मक राजाच्या छत्राखाली कुंडीनपुराचे वैभव सारखे वाढत गेले. भीष्मकाच्या पुत्राचा रुक्मिणी श्रीकृष्णा सोबत झालेल्या युद्धात पराभव झाल्यावर त्याने कुंडीपूर सोडून बोचकट अर्थात आजच्या भातकुली येथे राजधानी स्थापन केली आणि त्यानंतर मात्र कुंडीनपुराचे महत्व कमी झाले.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

भगवान श्रीकृष्णाने केले रुक्मिणीचे हरण कुंडीलपूर नगरीची राजकन्या असणाऱ्या रुक्मिणीचा विवाह तिचा मोठा भाऊ सुभानदेव याने, चेदी देशाचा राजा असलेल्या शिशुपाल याच्याशी ठरवला होता. मात्र हा विवाह राजा भिस्मक आणि रुक्मिणीला मान्य नव्हता. तिची इच्छा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याच्याशी विवाह करण्याची होती. सुभानदेवचा अट्टाहास लक्षात येताच रुक्मिणीने आपल्या मनाने विवाह विषयी स्वतः निर्णय घेण्याचा संकल्प केला. चेदी देशाचा राजा शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचे लग्न लावून देण्याची तयारी रुक्मिणी केली असतानांच, विवाह सोहळ्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे म्हणजेच अमरावती शहरात असणाऱ्या श्री अंबादेवीच्या दर्शनासाठी रुक्मिणी रितीरीवाजाप्रमाणे कुंडीलपूर येथून निघाली. यापूर्वी मात्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला एक लखोटा म्हणजे पत्र लिहून आपले अंबादेवी मंदिरातून हरण करावे, असा संदेश पाठवला होता. आणि ठरल्याप्रमाणे रुक्मिणी अंबादेवीचे दर्शन करीत असतांनाच भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून तिला द्वारकेस नेले आणि त्याच ठिकाणी तिच्याशी लग्न केले. रुक्मिणीच्या हरणाच्या वेळेस अंबादेवी मंदिर परिसरात बलराम सैन्यासह उपस्थित होते आणि यावेळी रुक्मिणीच्या सैन्यासोबत बलरामाच्या सैन्याचे युद्ध झाले. या युद्धात बलरामाने रुक्मिणीच्या भावाची दाढी मिशी काढून टाकली आणि तो पुढे भोजकट अर्थात भातकुली या गावात राहायला गेला. त्या परिसरातून वाहणाऱ्या नदीला आजही दाढीपेढी हेच नाव आहे.

कौंडण्यपूर
कौंडण्यपूर

पंचमुखी महादेवाचे दर्शन कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागच्या बाजूला भुयारामध्ये महादेवाचे पंचमुख असणारे शिवलिंग आहे. पंचमुखी महादेव म्हणून या शिवलिंगाची पूजा केली जाते. या परिसरात एकूण दोन भुयारांमध्ये शिवलिंगाचे दर्शन भाविकांना पहायला मिळते. परीसरात अनेक पौराणीक बाबी आजही पहायला मिळतात आजुबाजुचे उत्खनन झाले तर त्या काळचे वैभव आजही पहायला मिळु शकते असे संशोधकांना वाटते

मंदिरात असे होतात धार्मिक कार्यक्रम कौंडिण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात रोज सकाळी पहाटे पाच वाजता नित्य पूजेला सुरुवात होते. पूजेसाठी आलेल्या यजमानांच्या हस्ते अभिषेक, पूजापाठ व आरती केली जाते. दररोज सायंकाळी हरिपाठ व शेजारती होते. प्रत्येक एकादशीला भाविकांच्या उपस्थितीत भजन व आरती होते आणि द्वादशीला महाप्रसाद होतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला श्री संत सखाराम महाराज यांचा समाधी सोहळा उत्सव असतो. कार्तिक महिन्यात रोज पहाटे काकड आरती, त्याचप्रमाणे नियोजित यजमानांच्या हस्ते अभिषेक, पूजा व प्रसाद असतो. कार्तिक प्रतिपदेला संत मंतांच्या व आमंत्रित पाहुण्यांचा तसेच असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रवचन, कीर्तनकाला व दहीहंडी सोहळा असतो. आषाढी पौर्णिमेला देखील सर्व भक्त मंडळींच्या उपस्थितीत प्रवचन, कीर्तन, काला व दहीहंडी सोहळा असतो.

हेही वाचा Krishna Janmashtami 2022 पुण्यातील इस्कॉन मंदिरात अनोख्या पद्धतीने साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.