ETV Bharat / city

काँग्रेस माजी नगरसेवकाचा संपत्तीच्या वादातून खून; दोघांना अटक - murder in nagpur

काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सदर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. जेरॉन ऊर्फ सेबीस्टीयन निकोलस आणि जय जंगम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नागपूर क्राइम
काँग्रेस माजी नगरसेवकाचा संपत्तीच्या वादातून खून; दोघांना अटक
author img

By

Published : Aug 18, 2020, 10:11 AM IST

नागपूर - काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांचा दोन आरोपींनी निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सदर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. जेरॉन ऊर्फ सेबीस्टीयन निकोलस आणि जय जंगम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संपत्तीच्या वादातून हे दोन्ही आरोपी मागील अनेक दिवसांपासून उसरे यांच्या मागावर होते, अशी माहिती पुढे आली आहे.

काँग्रेस माजी नगरसेवकाचा संपत्तीच्या वादातून खून; दोघांना अटक

देवा उसरे आतापर्यंत तीनवेळा महापालिकेत निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत ते महापालिका निवडणूक हरले. काल सकाळी गड्डीगोदाम परिसरातील भारत टॉकीजजवळ असलेल्या चहा टपरीजवळ देवा उसरे येताच चाकूचे वार करत कुऱ्हाडीने देखील घाव घातले. या घटनेनंतर नागपूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती.

संबंधित घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती. त्याच दरम्यान देवा उसरे यांच्या खुनाची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फूटेज आपल्या ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन्ही आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी शोधकार्याची गती वाढवली. यानंतर जेरॉन ऊर्फ सेबीस्टीयन निकोलस आणि जय जंगम अशी गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी संबंधितांना रात्री अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून त्यांनी खून केल्याची कबुली दिलीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.