अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( MP Navneet Rana and Badnera MLA Ravi Rana ) यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीच्या ( Yuva Swabhiman Party ) 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस ठाण्यातसह इतर दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( case has been registered at Gadgenegar and Rajapeth police stations ) करण्यात आला आहे. शनिवारी विना परवानगी राणा दांपत्यानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री बारा वाजेपर्यंत विना परवानगी सुरु असणाऱ्या गोंधळामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
Maharashtra | Four cases have been registered in four police stations of Amravati against MP Navneet Rana, MLA Ravi Rana and their workers u/s 143, 341, 291 and 135 of IPC for obstructing traffic, taking out rally without permission & violating police orders: Amravati police
— ANI (@ANI) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Four cases have been registered in four police stations of Amravati against MP Navneet Rana, MLA Ravi Rana and their workers u/s 143, 341, 291 and 135 of IPC for obstructing traffic, taking out rally without permission & violating police orders: Amravati police
— ANI (@ANI) May 29, 2022Maharashtra | Four cases have been registered in four police stations of Amravati against MP Navneet Rana, MLA Ravi Rana and their workers u/s 143, 341, 291 and 135 of IPC for obstructing traffic, taking out rally without permission & violating police orders: Amravati police
— ANI (@ANI) May 29, 2022
शहरातून काढली भव्य मिरवणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी 22 एप्रिल रोजी गेलेले राणा दांपत्य शनिवारी तब्बल 36 दिवसानंतर अमरावतीत परतले. यानंतर त्यांनी अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचवटी चौकातून खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक काढली. राजकमल चौक येथे त्यांचे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. राजापेठ परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यानंतर शंकर नगर स्थित राणा यांच्या निवासस्थानी राणा दांपत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावून हा संपूर्ण गोंधळ सुरू असल्यामुळे नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी कलम 341 143 291 आणि 135 अन्वये गुन्हे दाखल केले आहे.