अमरावती: जनावरांना लस देण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित (animal husbandry department female employee suspended) करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला. Female EmPloyee Suspended Amaravati
आठशे रुपयांची लाच घेतली अन् नोकरी गमावली- मेळघाटातील पिपादरी व रुईफाटा या गावी हा गैरप्रकार घडत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन प्रशासनाने ही कार्यवाही केली. सविता नागोराव खनखने या पशुधन पर्यवेक्षक यांनी आठ पशुपालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे आठशे रुपये आकारल्याचे जिल्हा पशुसंवर्धन यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले. याबाबत पंचनामाही करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करुन कर्मचाऱ्याला निलंबित केले व चौकशीचे आदेश दिले आहेत.
माध्यमांच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली दखल - प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये या गंभीर प्रकाराविषयी बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.