अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून परीक्षेचा जो निकाल दिला जाणार आहे तो गुणांऐवजी श्रेणीच्या आधारावर असणार आहे. या निर्णयाचा प्रस्ताव विद्यापीठाने तयार केला असून त्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस मध्ये कुलगुरूंनी त्यांच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
Exam Fever 2022 - विद्यार्थ्यांच्या निकाल आता गुणांऐवजी श्रेणी आधारे - कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे - sant gadge baba amravati university exam 2022
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येणाऱ्या काळात संशोधनावर भर देणार आहे. सध्या नऊ विद्यार्थीच विद्यापीठात संशोधन करीत आहेत. संशोधकांची संख्या वाढण्याची नितांत गरज असून विद्यार्थ्यांना विद्यापीठ 24 तास उघडे ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी स्पष्ट केले.