अमरावती - आज अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाऱ्यांनी कापूर खरेदीला सुरूवात केली आहे. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीला नव्या कापसाच्या खरेदीला सुरुवात होते. त्याच पद्धतीने यावर्षीही सुरूवात झाली आहे.
कापसाला 7111 रुपये प्रति क्विंटल भाव
अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीचा श्री गणेशा केला आहे. यावेळी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शेतकरी ढोले यांच्या कापसाला 7111 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. दरवर्षी आम्ही या दिवशी कापूस खरेदीला प्रारंभ करत असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच, यंदा कापसाला चांगला भाव राहणार असून, हमी भावापेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी यावेळी वर्तवला आहे.