ETV Bharat / city

अमरावतीत रुग्णाकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना बसणार चाप! - कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी अमरावती शहरासह जिल्ह्यात जवळपास ४० खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी दिलेली आहे. सोबतच रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारांचे दर देखील निश्चित करून दिले आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल
जिल्हाधिकारी शैलेश नवाल
author img

By

Published : May 28, 2021, 4:40 PM IST

अमरावती - कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी अमरावती शहरासह जिल्ह्यात जवळपास ४० खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी दिलेली आहे. सोबतच रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारांचे दर देखील निश्चित करून दिले आहे. असे असताना देखील अनेक रुग्णालय कोरोना रुग्णाकडून अधिकचे पैसे उकळत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे आता या खासगी कोविड रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विशेष पथक नेमले आहे.

अमरावतीत रुग्णाकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना बसणार चाप!

'प्रत्येक 3 रुग्णालयामागे एक पथक'

प्रत्येक तीन रुग्णालयामागे एक पथक नेमण्यात आले असून हे पथक दरोरोज या रुग्णालयाचे ऑडीट करणार आहे. जर रुग्णालयाने आखून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतल्यास लोकांनी तत्काळ माहिती द्यावी, त्यानंतर रुग्णालयावर कारवाईदेखील केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

'चाचण्याचे दर निश्चित करणारा अमरावती राज्यातील पहिला जिल्हा?'
अमरावती जिल्ह्यात कोरोना बरोबरच म्यूकरमायकोसिस रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये या आजाराविषयी कमालीची भीती आहे. त्यामुळे अनेक लोक लक्षणे जाणवताच म्यूकरमायकोसिस निदानासाठी त्याची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जातात. तेथे रुग्णालयात रुग्णांकडून अधिक पैसे घेतल्या जाऊ नये यासाठी आता त्याचे दर अमरावतीत निश्चित करण्यात आले आहे. तसे चाचणीच्या दरांचे फलक प्रथम भागात लावणे हे रुग्णालयांना बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. म्यूकरमायकोसिस निदानासाठी चाचण्याचे दर निश्चित करणारा अमरावती हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत १००पेक्षा जास्त रुग्ण

अमरावती जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस या आजाराचे जवळपास आतापर्यंत १००पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जे लोक कोरोनामुक्त झाले आहे. अशा लोकांना म्यूकरमायकोसिस या आजाराचे काही लक्षणे आहे का याची तपासणी करण्यासाठी मोहीम राबविली जाईल, असेही जिल्हाधिकारी शैलेश यांनी सांगितले.

हेही वाचा - संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.