ETV Bharat / business

Share Market Crashed: शेअर बाजार गडगडला.. सेन्सेक्स, निफ्टीमध्ये झाली घसरण.. पहा कोणते शेअर्स नफ्यात, कोणते तोट्यात - निफ्टी

आज पुन्हा शेअर बाजार गडगडला आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 173.69 अंकांनी घसरला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 54.15 अंकांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

Share Market Update : Sensex crashes 173 points in early trade, Nifty down 54 points
शेअर बाजार गडगडला.. सेन्सेक्स, निफ्टीमध्ये झाली घसरण..
author img

By

Published : Feb 10, 2023, 12:50 PM IST

मुंबई: काल दिवसभरातील घसरणीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आशियाई आणि जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात १७३.६९ अंकांनी म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी घसरून ६०,६३२.५३ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 54.15 अंकांच्या म्हणजेच 0.30 टक्क्यांच्या घसरणीसह 17,839.30 अंकांवर व्यवहार करत होता.

नफा आणि तोटा शेअर्स: सेन्सेक्समधील 18 कंपन्यांचे समभाग लाल चिन्हाच्या श्रेणीत राहिले. म्हणजेच या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. तर एचडीएफसी आणि मारुतीचे शेअर्स किंचित वाढीसह व्यवहार करत आहेत. विशेष म्हणजे आर्थिक निर्देशांक प्रदान करणार्‍या एमएससीआयने पुनरावलोकनानंतर आपल्या निर्देशांकातील चार कंपन्यांचे महत्त्व कमी केले आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्याचाही परिणाम बाजारावर होऊ शकतो.

रुपया 12 पैशांनी घसरला: देशांतर्गत शेअर बाजारातील मंदीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 12 पैशांनी 82.63 रुपये प्रति डॉलर कमकुवत झाला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी निधीचा प्रवाह यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित झाल्या आहेत. आंतरबँक परकीय चलन बाजारात 82.61 प्रति डॉलर कमकुवत उघडल्यानंतर, रुपया मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत 12 पैशांनी कमी होऊन 82.63 प्रति डॉलरवर व्यवहार करत होता. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी वाढून 82.51 वर बंद झाला.

निफ्टी ५० मध्ये काय आहे स्थिती: शेअर बाजारात निफ्टी 50 च्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदाल्को, टाटा स्टील आणि विप्रो या कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सर्वाधिक घसरले. याउलट, यूपीएल, एलटी, एचडीएफसी लाइफ, एम अँड एम आणि आयटीसी या पाच कंपन्यांचे शेअर्स हे सुरुवातीच्या व्यवहारात वाढल्याचे दिसून आले. हाँगकाँग आणि चीनसह बहुतेक आशियाई बाजार नकारात्मक क्षेत्रात आज दिसून आले आहेत.

आशियातील स्टॉक्स झाले कमी: एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्चचे प्रमुख दीपक जसानी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, यूएस इक्विटीज दुसर्‍या दिवशी घसरल्यानंतर शुक्रवारी आशियातील स्टॉक्स मुख्यतः कमी होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईशी लढा देण्यासाठी पाऊले उचलल्याने गुंतवणूकदारांनी उच्च व्याजदरांच्या संभाव्यतेशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्रेझरी उत्पन्न वाढले.

हेही वाचा: Raid on Adani Group Stores: मोठी कारवाई.. अदानी समूहाच्या ठिकाणांवर उत्पादन शुल्क आणि कर विभागाकडून छापे..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.