मुंबई : बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो.
डायनॅमिक इंधन किंमत प्रणाली : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत.
किमती जाहीर : नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 42 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 38 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 06 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 61 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 107 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 55 पैसे आहे.