ETV Bharat / business

Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुमचा लॅपटॉप, मोबाईलही कव्हर होतो का? जाणून घ्या सविस्तरपणे - Travel insurance importance

या उन्हाळ्यात जर तुम्ही परदेशात प्रवास करत असाल तर कोणतीही वैद्यकीय आणीबाणी, उड्डाणाला होणारा विलंब, सामान गमावणे, पासपोर्ट हरवणे इत्यादींमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी स्वतःचा विमा काढा. तुम्ही लॅपटॉप, मोबाईल आणि मौल्यवान कागदपत्रांचा देखील विमा काढू शकता. काही देशांमध्ये प्रवास विमा का अनिवार्य केला आहे जाणून घ्या.

Travel Insurance
ट्रॅव्हल इन्शुरन्स
author img

By

Published : Feb 24, 2023, 1:33 PM IST

हैदराबाद : परदेशात प्रवास केल्याने तुम्हाला तेथील नवीन संस्कृती अनुभवता येते. तसेच अनेक अनुभवांसोबतच एक नवीन दृष्टीकोन तयार होतो. त्रासमुक्त परदेशी सहलीसाठी तुम्ही सहलीचे आधीच नियोजन केले पाहिजे. जेव्हा तुम्हाला परदेशात जायचे असेल तेव्हा व्हिसा, तिकीट आणि निवास यासारख्या प्रत्येक बाबींचे नियोजन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवास विमा. परदेशात सहलीला जाण्यापूर्वी प्रवाशांना विविध बाबींचा विमा उतरवणे आवश्यक आहे.

वैद्यकीय इमरजन्सी : परदेश दौऱ्यावर वैद्यकीय इमरजन्सीचा सामना करणे फार त्रासदायक असते. अशा परिस्थितीत अज्ञात ठिकाणी अडकल्याने तुमचा मूड तर खराब होतोच पण तुमच्या खिशावरही भार पडतो. अशा वेळी तुम्हाला प्रवास विमा मदत करू शकतो, जो आजारपणात तुमचा वैद्यकीय खर्च उचलतो. ही पॉलिसी आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय गरजांसह अपघातांसाठी भरपाई प्रदान करते.

फ्लाइट विलंब : कोणत्याही कारणामुळे पॉलिसीमध्ये निर्दिष्ट केलेल्या किमान तासांपेक्षा विमानाला जास्त उशीर झाल्यास ही पॉलिसी तुमच्या कामी येते. अशा परिस्थितीत ही पॉलिसी तुम्हाला विविध खर्चांसाठी विशिष्ट रक्कम देते. यामध्ये जेवण आणि इतर आवश्यक खर्चाचा समावेश आहे. हे खर्च पॉलिसीधारकाला अगोदरच करावे लागतात. त्यानंतर संबंधित बिलं विमा कंपनीकडे सादर केली जाऊ शकतात आणि त्या द्वारे खर्च वसूल केला जाऊ शकतो.

दरम्यान सामान हरवणे : प्रवास करताना सामान हरवणे ही एक मोठी चिंतेची बाब आहे. यामुळे तुमच्या प्लॅन्सला बाधा येण्यासोबतच याचा तुमच्या बजेटवरही परिणाम होतो. तुम्ही नव्या शहरात पाऊल ठेवले, नवीन गोष्टी शिकायला गेले पण समजा तुमचे सामानच तुमच्या पर्यंत पोहचले नाही तर किती मोठी समस्या निर्माण होईल? अशा प्रकरणांमध्ये, ही पॉलिसी तुम्हाला तुमच्या सामानाच्या रकमेची परतफेड करेल.

पासपोर्ट हरवणे : परदेशात सर्वकाही व्यवस्थित असले तर तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचा पासपोर्ट हा तुमच्या परदेश प्रवासातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर परदेशात गेल्यावर तुमचा पासपोर्ट तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला काही समस्या आणि अतिरिक्त खर्चही सहन करावा लागू शकतो. मात्र ट्रॅव्हल इन्शुरन्स डुप्लिकेट पासपोर्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेला खर्च कव्हर करू शकतो.

ट्रिपचे वेळापत्रक बदलणे : जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू, अपघात, वैयक्तिक आरोग्य समस्या इत्यादीमुळे तुमची सहल रद्द करावी लागेल किंवा तारखांमध्ये बदल करावा लागला तर अशा प्रकरणांमध्ये प्रवास विमा परत न केलेला खर्च कव्हर करतो. साधारणपणे, हॉटेल बुकिंग आणि फ्लाइट तिकिटे परत न करण्यायोग्य असतात. असा खर्च विमा पॉलिसीमधून वसूल केला जाऊ शकतो. या मानक संरक्षणांव्यतिरिक्त, प्रवास विमा लॅपटॉप, मोबाइल, मौल्यवान कागदपत्रे आणि सामानाची हानी कव्हर करतो. काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवास विमा अनिवार्य आहे.

हेही वाचा : Ola Uber Rapido Bikes banned: परिवहन विभागाचा मोठा निर्णय.. ओला, उबेर, रॅपीडोच्या बाईक सेवेवर बंदी..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.