ETV Bharat / business

Adani Enterprises FPO: अर्थसंकल्पापूर्वी अदाणींचा धमाका.. शेअर बाजारात येणार २० हजार कोटींचा एफपीओ, 'इतक्या' रुपयांना करता येणार खरेदी शेअर - 20000 cr offers shares at discount

राष्ट्रीय शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा एफपीओ येणार आहे. या माध्यमातून तब्बल २० हजार कोटी रुपये जमवण्याचे उद्दिष्ठ अदानी समूहाने ठेवले आहे. २७ जानेवारीपासून हा एफपीओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. जाणून घेऊयात या एफपीओविषयी.. Goutam Adani Company offer, Budget 2023

Adani Enterprises FPO for collecting 20,000 cr offers shares at discount before budget 2023
अर्थसंकल्पापूर्वी अदाणींचा धमाका.. शेअर बाजारात येणार २० हजार कोटींचा एफपीओ, 'इतक्या' रुपयांना करता येणार खरेदी शेअर
author img

By

Published : Jan 19, 2023, 1:53 PM IST

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड शेअर बाजारातून 20,000 कोटी रुपये उभारण्यासाठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) आणण्याच्या तयारीत आहे. हा FPO 27 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांना सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी येत असलेल्या या अदानी समूहाच्या एफपीओमुळे शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहावयास मिळू शकते.

प्रति शेअर फ्लोअर प्राईस निश्चित: कंपनीने बुधवारी या FPO साठी प्रति शेअर 3,112 रुपये फ्लोअर प्राईस निश्चित केली आहे. यासोबतच एफपीओ आणण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजकडे कागदपत्रेही दाखल करण्यात आली आहेत. कंपनी फॉलो-ऑनमध्ये सहभागी असलेल्या मर्चंट बँकर्सकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मर्चंट बॅंकर्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी एफपीओ लॉन्च करण्याची पुढील प्रक्रिया सुरु करणार आहे.

किमान चार शेअर खरेदी करावे लागणार: FPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी FPO ची कॅप किंमत 3,276 रुपये प्रति शेअर आहे. या अंतर्गत, किमान 4 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. गुंतवणूकदार 31 जानेवारीपर्यंत त्याचे सदस्यत्व घेऊ शकतील. अर्थसंकल्पानंतर 3 फेब्रुवारीला शेअरचे वाटप होईल. याशिवाय रिफंड प्रक्रियेसाठी 6 फेब्रुवारी आणि डीमॅट खात्यात शेअर्स जमा करण्यासाठी 7 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

एफपीओचे पैसे 'या' ठिकाणी गुंतवणार: FPO कडून मिळालेल्या 20,000 कोटींपैकी 10,869 कोटी रुपये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विद्यमान विमानतळांचा विकास आणि नवीन एक्सप्रेसवे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय 4,165 कोटी रुपये विमानतळ, रस्ते आणि सौर प्रकल्पांच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. अदानी यांनी उद्योगपती म्हणून सुरुवात केली. आज त्यांचा व्यवसाय बंदरे, कोळसा खाण, विमानतळ, डेटा सेंटर आणि सिमेंट तसेच ग्रीन एनर्जीपर्यंत विस्तारला आहे.

एफपीओमधील गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मत: इक्विटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओच्या माध्यमातून कंपनीचे शेअर्स सवलतीत खरेदी करण्याची ही चांगली संधी असेल. अदानी ग्रुपच्या स्टॉकने मागील काळात चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने नवीन व्यवसायात प्रवेश केला आहे आणि आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला आहे. 2022 च्या सप्टेंबर तिमाहीतील कंपनीचे निकाल देखील तेच दर्शवतात.

कंपनीचा नफा झालाय दुप्पट: कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 212 कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट होऊन 460.94 कोटी रुपये झाला आहे. कामकाजातून मिळणारा महसूल १८९ टक्क्यांनी वाढला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, IPO मधील गुंतवणुकीच्या तुलनेत FPO साधारणत: मूल्यवर्धित आहे. कारण गुंतवणूकदारांना कंपनीचा स्टॉक, परिणाम कामगिरी, व्यवसाय सराव, वाढीचा अंदाज याबद्दल कल्पना येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणूकदार हा स्टॉक आणि त्याची किंमत श्रेणी खूप परिचित आहेत.

हेही वाचा: बजेट 2023 केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अपेक्षा वाढल्या शेअर बाजारात येणार तेजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.