मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ५३४.२३ अंशांनी घसरून ३१,२७८.२७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १२९.३५ अंशांनी घसरुन ९,१८४.५५ वर पोहोचला. बँकांचे शेअर घसरले आहेत.
बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक ५ टक्क्यापर्यंत घसरले. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी ट्विन्स, एसबीआय, इन्फोसिस बँक आणि टीसीएसचे शेअर घसरले आहेत. हिरो मोटोकॉर्प, सन फार्मा, एल अँड टी, ओएनजीसी आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत.
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ४८३.५३ अंशांनी वधारुन ३१,८६३.०८ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १२६.६० अंशांनी वधारुन ९,३१३.९० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी ११४.५८ कोटी रुपयांचे शेअर गुरुवारी विकले होते.
हेही वाचा- कोरोनाशी लढा: सरकार १५.४० कोटी एचसीक्यू गोळ्यांचा देशात करणार पुरवठा
कोरोनाच्या संकटामुळे जागतिक शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे देशातील शेअर बाजार खुला होता निर्देशांक घसरल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. फिच या पतमानांकन संस्थेने देशाचा आर्थिक विकासदर हा आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ०.८ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा- कोरोनाने अमेरिकेत महामंदी : २.६ कोटी बेरोजगारांचे मदतीकरता सरकारकडे अर्ज