मुंबई - गेली काही दिवस शेअर बाजाराने निर्देशांकाचे नोंदविलेले विक्रम आज मोडित काढले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६३.४२ अंशाने वधारून ४१,७३७.३४ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २३.१५ अंशाने वधारून १२, २८२.८५ वर पोहोचला.
शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १०० अंशाने वधारला. त्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४१,७३७.३४ अंशावर जावून पोहोचला. गेली काही दिवस विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शेअर खरेदीचा धडाका सुरू ठेवल्याने शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक गुरुवारी ११५.३५ अंशाने वधारून ४१,६७३.९२ अंशावर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.०५ अंशाने वधारून १२,२५९.७० वर स्थिरावला.