मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 627 अंशाने घसरला आहे. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे शेअर घसरले आहेत. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 627.43 अंशाने घसरून 49,509.15 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 154.40 अंशाने घसरून 14,690.70 वर स्थिरावला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
एचडीएफसी ट्विन्सचे शेअर 4 टक्क्यापर्यंत घसरले आहेत. त्यापाठोपाठ पॉवरग्रीड, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, कोटक बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एचयूएल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि अफगाण राष्ट्राध्यक्ष घानी यांच्यामध्ये शांतता प्रक्रियेवर चर्चा
देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना शेअर बाजारात घसरण होत असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख विनोद मोदी यांनी सांगितले. कोरोनाच्या काळातील निर्बंधामुळेही गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचे मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-आरबीआयकडून स्वयंचलित आवर्ती देयकांचे पालन करण्याकरता सहा महिन्यांची मुदतवाढ
वित्तीय विशेषत: खासगी बँकांच्या शेअर विक्रीतून नफा नोंदविण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. तसेच आयटी कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला. असे असले तरी गुंतवणुकदारांनी एफएमसीजी, मेटल आणि फार्मा कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.58 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 63.80 डॉलर आहे.