मुंबई - गुरुवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजार 900 अंकानी वधारला. आयसीआयसीआय बँक, इन्फोसीस, एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीत वाढ झाली. 33640.73 या इथपर्यंत पोहोचल्यावर सेन्सेक्स 33615.85 वर स्थिरावला. नॅशनल स्टॉक एक्सेंजचा निर्देशांक 9800.55 वर पोहोचला.
पहिल्या सत्रात मारुतीला गुंतवणुकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली. यानंतर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा यांच्या शेअर्सचे भाव वधारले तर सन फार्माच्या शेअरच्या भाव खाली आहेत.
परकीय गुंतवणूकदारांनी बुधवारी भारतीय शेअर बाजारात 722.08 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. लॉकडाऊननंतर हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येईल, या आशेवर गुंतवणूक करत असल्याचे गुंतवणूकदारांनी म्हटले. कोरोनावरील उपचाराच्या चाचण्या यशस्वी होतील, अशी शक्यता असल्याने गुंतवणुकीत वाढ होत आहे.
शांघाई आणि टोकियामध्ये बोरस शेअर बाजारात समाधानकारक गुंतवणूक झाली तर हाँगकाँग आणि सेऊलमधील बाजार सुट्टीमुळे बंद होते. क्रुड आईलच्या किमती 26.55 अमेरिकन डॉलर प्रती बॅलरवर स्थिरावल्या आहेत.