ETV Bharat / business

शेअर बाजारात दिवसाखेर ९३८ अंशांची पडझड; निफ्टी १४,०००हून खाली - शेअर बाजार अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजाराच्या पडझडीनंतर निफ्टीच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक २९४.६५ अंशाने घसरून १३,९४४.२५ वर पोहोचला.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Jan 27, 2021, 3:59 PM IST

Updated : Jan 27, 2021, 4:28 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग चौथ्या दिवशी घसरला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ९३८ अंशाने घसरून ४७,५०० वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक ही घसरून १४,००० अंशाहून कमी झाला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सलग चार सत्रात २,३८२.१९ अंशाने घसरला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २७१.४० अंशाने घसरून १३,९६७.५० वर स्थिरावला. चार सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६७७.२० अंशाने घसरला आहे.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

अ‌ॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांचा नफा नोंदविण्याकडे कल राहिल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीओ) भारतीय भांडवली बाजारात सोमवारी ७६५.३० कोटी रुपयांचे शेअर विकल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून दिसून आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४१ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ५५.८७ डॉलर आहेत.

दुपारनंतर शेअर बाजारात घसरण-

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २ वाजून ४५ मिनिटाला १,०३६.७८ अंशाने घसरून ४७,३१०.८१ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या पडझडीनंतर निफ्टीच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक २९४.६५ अंशाने घसरून १३,९४४.२५ वर पोहोचला. बँकिंग, वित्तीय कंपन्या, तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कंपन्यांच्या तिमाहीतील कामगिरीचे संमिश्र परिणामामुळेही शेअरच्या विक्रीवर दबाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा-ब्रँडेड पेट्रोलचे दर भडकले! राजस्थानात ओलांडला १०० रुपयांचा टप्पा...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढत आहेत. कोरोनाच्या निर्मुलनासाठी लसीकरण मोहिम भारतासह विविध देशांत सुरू आहे. त्यामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचाच परिमाण म्हणून इंधनाचे दर वाढत आहेत.

हेही वाचा-टिकटॉक अखेर देशातून गुंडाळणार गाशा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडेही शेअर बाजार गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.

Last Updated : Jan 27, 2021, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.