मुंबई - शेअर बाजार निर्देशांक हा सकाळच्या सत्रात ३०० अंशाने वधारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
सकाळी साडेनऊ वाजता शेअर बाजार १२२.५१ टक्क्यांनी वधारून ३७,०८०.६७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३५.३० अंशाने वधारून १०, ९६१.१५ वर पोहोचला. मंगळवारी शेअर बाजार निर्देशांका ६२३.७५ अंशाने घसरून ३६,८५८.१६ वर पोहोचला होता.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-
टाटा स्टील, वेदांत, येस बँक, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, इंडुसइंड बँक, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीचे शेअर हे ३.५३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
सन फार्मा, पॉवरग्रीड, मारुती, एचसीएल टेक, टीसीएस आणि कोटक बँकेचे शेअर हे ४.२६ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.