मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २८२.२९ अंशाने वधारून ४३,८८२.२५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ८७.३५ अंशाने वधारून १२,८५९.०५ वर स्थिरावला.
बजाज फिनसर्व्हचे सर्वाधिक ९ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले. त्यापाठोपाठ टायटन, बजाज फायनान्स, कोटक बँक, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया आणि एनटीपीसीचे शेअर वधारले. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, सन फार्मा, अॅक्सिस बँक, ओएनजीसी बँक आणि एचयूएलचे शेअर घसरले.
कोटक सिक्युरिटीजचे व्हीपी पीसीजी रिसर्च संजीव झरबडे म्हणाले, की दिवाळी आठवडाखेर शेअर बाजार निर्देशांक १ टक्क्यांनी वधारत आहे. अर्थव्यवस्था सावरणे आणि बाजाराचे मूल्यांकनावर शेअर बाजाराचे लक्ष वळणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४१ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४४.३८ डॉलर आहेत.
सकाळच्या सत्रात २५० अंशाने वधारला निर्देशांक-
शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २५० अंशाने वधारला. एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीमधील सातत्य या कारणाने शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली आहे.