ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक दिवसाखेर २५८ अंशाने वधारला; निफ्टी पुन्हा १५ हजारांच्या टप्प्यावर - शेअर मार्केट अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २५७.६२ अंशाने वधारून ५१,०३९.३१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ११५.३५ अंशाने वधारून १५,०९७.३५ वर स्थिरावला.

Bombay stock Exchange
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Feb 25, 2021, 5:11 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २५८ अंशाने घसरला आहे. तर निफ्टीने पुन्हा १५,०० चा टप्पा ओलांडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‌ॅक्सिस बँक आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २५७.६२ अंशाने वधारून ५१,०३९.३१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ११५.३५ अंशाने वधारून १५,०९७.३५ वर स्थिरावला.

हेही वाचा-इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

ओएनजीसीचे सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अ‌ॅक्सिस बँक आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, एल अँड टी, कोटक बँक आणि टायटनचे शेअर घसरले आहेत. एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रांमधील निर्देशांक वधारले आहेत. वित्तीय, ऑटो आणि औषधी कंपन्यांचे शेअर १ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.सलग तिसऱ्या दिवशी निफ्टीने १५,००० चा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा-इंधनावरील कर कपातीकरता राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय असण्याची गरज

जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती-

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पॉवेल यांनी सकारात्मक भाष्य केल्याने जगभरातील शेअर बाजारात सकारात्मकता निर्माण झाल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुण रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.५० टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६६.५१ डॉलर आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.