ETV Bharat / business

शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण; येस बँकेचे ८ टक्क्यांनी वधारले शेअर

author img

By

Published : Oct 7, 2019, 5:08 PM IST

आरबीआयने चालू आर्थिक वर्षात विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाहून कमी राहिल, असे पतधोरण आढाव्यात म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करूनही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकला नाही.

संग्रहित - शेअर बाजार

मुंबई - सलग सहाव्या दिवशी मुंबई शेअर बाजारात घसरण झाली. निर्देशांक १४१ अंशाने घसरून शेअर बाजार बंद झाला. आयटीसी, टीसीएस, एल अँड टी, एचडीएफसी ट्विसन्स आणि इन्फोसिसच्या शेअरच्या घसरणीने मुंबई शेअर बाजारात पडझड झाली.

शेअर बाजार निर्देशांक १४१.३३ अंशाने घसरून ३७,५३१.९८ वर बंद झाला. तर निफ्टी बंद होताना निर्देशांक ४८.३५ टक्क्यांनी घसरून ११,१२६.४० वर पोहोचला.

हेही वाचा-बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत समाज माध्यमात अफवा; येस बँकेची मुंबई पोलिसात तक्रार

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
ओएनजीसी, आयटीसी, टाटा स्टील, एम अँड एम, टाटा मोटर्स, एल अँड टी, टीसीएस, सन फार्म, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्राचे शेअर २.९७ टक्क्यापर्यंत घसरले. तर गेले काही दिवस घसरणाऱ्या येस बँकेचे शेअरमध्ये सुधारणा झाली. बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटो कॉर्प आणि बजाज फायनान्सचे शेअर २.५३ टक्क्यांनी वधारले.

हेही वाचा-सणासुदीला ग्राहकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात

आरबीआयने चालू आर्थिक वर्षांत विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाहून कमी राहिल, असे पतधोरण आढाव्यात म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करूनही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकला नाही.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.