ETV Bharat / business

सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात घसरण; निर्देशांकांत दिवसाखेर ५६२ अंशाने पडझड

author img

By

Published : Mar 17, 2021, 5:00 PM IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६२.३४ अंशाने घसरून ४९,८०१.६२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १८९.१५ अंशाने घसरून १४,७२१.३० वर स्थिरावला.

Share market
शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सलग चौथ्या सत्रात घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६२.३४ अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजाराला फटका बसला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६२.३४ अंशाने घसरून ४९,८०१.६२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १८९.१५ अंशाने घसरून १४,७२१.३० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-

ओएनजीसीचे सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यापर्यंत शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ एनटीपीसी, सन फार्म, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर आयटीसी, इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसीचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-'त्या' मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील; फेब्रुवारीतच विकली होती कार

देशाच्या विविध भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला आहे. महागाईचे प्रमाण वाढत असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढत असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीतज्ञ विनोद मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा-'त्या' मर्सिडिज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो; सचिन सावंतांनी मागितला खुलासा

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची मंगळवारपासून दोन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे शेअरवर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. सार्वजनिक बँकांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामध्ये धातू आणि वाहन कंपन्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.८९ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६८.७८ डॉलर आहेत.

हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.