ETV Bharat / business

निर्देशांक १९६ अंशाने घसरून शेअर बाजार बंद; ऑटो कंपन्यांना मोठा फटका

author img

By

Published : Jul 29, 2019, 6:29 PM IST

विदेशी गुंतवणुकदारांचे निधी काढून घेण्याचे प्रमाण आणि जागतिक आर्थिक मंचावरील प्रतिकूल स्थिती याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात घसरण होत आहे.

शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक १९६ अंशाने घसरून बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीचा सर्वात अधिक वाहन कंपन्यांना (ऑटो) मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने नव्या आणि जुन्या वाहनांच्या नोंदणीसाठी शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साह देणारे स्विकारले आहे. त्याचा परिणाम म्हणून ऑटो कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.

विदेशी गुंतवणुकदारांचे निधी काढून घेण्याचे प्रमाण आणि जागतिक आर्थिक मंचावरील प्रतिकूल स्थिती याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात घसरण होत आहे. शेअर बाजार निर्देशांक १९६.८२ अंशाने घसरून ३७,६८८.२८ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ९५.१० अंशाने घसरून ११,१८९ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले -
टाटा मोटर्सचे शेअर सर्वात अधिक ६.५२ टक्क्यांनी घसरले आहेत. तर वेदांताचे शेअर ५.०९ टक्के, बजाज ऑटो ४.९९ टक्के, मारुती सुझुकी ४.२६ टक्के घसरले आहेत. ३० सूचीबद्ध असलेल्या शेअर निर्देशांकापैकी २३ कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. तर उर्वरित ७ कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, इंडुसइंड बँक, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय आणि भारती एअरटेल कंपनीचे शेअर ३.३२ टक्क्यांनी वधारले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.