मुंबई - निर्देशांकात १७४ अंशाची घसरण होवून शेअर बाजार बंद झाला आहे. बंद होताना शेअर बाजाराचा ३८,५५७.०४ निर्देशांक होता. कच्चे तेल, गॅस, उर्जा, धातू आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
निर्देशांकात ५७ अंशाची घसरण होवून निफ्टी ११,४९८.९० वर बंद झाली. येस बँक, सन फार्मा,कोटक बँक, आयसीआयसी बँक आणि पॉवरग्रीड या कंपन्यांचे शेअर १.८१ टक्क्यापर्यंत वधारले.
या कंपन्यांचे शेअर घसरले
बजाज फायनान्सचे शेअर सर्वात अधिक ४.९१ टक्क्यांनी घसरले आहेत. जून तिमाहीदरम्यान टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसची (टीसीएस) बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याचा परिणाम टीसीएसचे शेअर १.१६ टक्क्यांनी घसरले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, अॅक्सि बँक, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, बजाज ऑटो आणि एसबीआयचे शेअर २.९४ टक्क्यापर्यंत घसरले.
इंडियन ऑटोमोबाईल मॅन्य़ुफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहनांच्या विक्रीत घट झाल्याची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर ऑटो कंपन्यांचेही शेअरमध्ये घसरण झाली आहे.