मुंबई - सरकारी बँकांचे शेअरचे आज मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १० सरकारी बँकांचे विलिनीकरणाची घोषणा केल्याने हा परिणाम दिसून आला.
पंजाब नॅशनल बँकचे ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाबरोबर विलिनीकरण होणार आहे. शेअर बाजारात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरला सर्वात अधिक फटका बसत ७ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-एप्रिल-जुलैदरम्यान देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात २.९ टक्क्यांची घसरण
ओरिअन्टल बँक ऑफ कॉमर्सचे शेअर हे ५ टक्क्यांनी घसरले आहेत. कॅनरा बँक सिंडिकेट बँकेबरोबर विलिनीकरण होणार आहे. कॅनरा बँकेचे शेअर ६ टक्क्यांनी घसरले आहेत. तर सिंडिकेट बँकेचे शेअर १ टक्क्यांनी वधारले आहे.
हेही वाचा-उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत घसरण; गेल्या १५ महिन्यात ऑगस्टमध्ये पीएमआयचा निचांक
युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर ६ टक्के घसरले आहेत. या बँकेचे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेत विलिनीकरण होणार आहे.
हेही वाचा-बँकांच्या विलिनीकरणानंतर एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही
इंडिया बँकेचे शेअर ६ टक्क्यांनी तर अलाहाबाद बँकेचे शेअर हे २ टक्क्यांनी घसरले आहेत. या दोन्ही बँकांचे विलिनीकरण होणार आहे. केंद्र सरकारने सरकारी बँकांना ७० हजार कोटींचे भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.