नवी दिल्ली - सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर १४ ते १५ पैशांनी कमी झाले आहेत. डिझेलचे दर प्रति लिटर १५ ते १६ पैशांनी कमी झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.४१ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८१, कोलकात्यात ७८ रुपये आणि चेन्नईत ७८.३४ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ६८.७७ रुपये आहे. मुंबईत ७२.११ रुपये, कोलकात्यात ७१.३३ रुपये आणि चेन्नईत ७२.६७ रुपये प्रति लिटर आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पात ३०० हून अधिक वस्तुंवरील आयात शुल्कात होणार वाढ ?
गेल्या दोन दिवसात पेट्रोल-डिझेल २९ पैशांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या बॅरलचे दर अंशत: वाढले आहेत. मागणी वाढल्याने खनिज तेलाचे दर वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा-व्होडाफोनचे शेअर ३४ टक्क्यांनी घसरले; 'हे' आहे घसरणीचे कारण
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या दरावर अवलंबून असतात. तसेच रुपया-डॉलरमधील विनिमय दराचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होतो. देशात लागणाऱ्या खनिज तेलापैकी ८० तेलइंधन भारतात आयात करण्यात येते.