मुंबई - शेअर बाजार निर्देशांक खुला होताना ३०० अंशांनी वधारून ३२,०५६.४३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १०५.२५ अंशांनी वधारून ९,३८७.५५ वर पोहोचला.
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ४१५.१६ अंशांनी वधारून ३१,७४३.०८ वर पोहोचला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंडच्या चलन तरलतेसाठी ५० हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारला होता.