ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; सरकारी कंपन्यांचे 'थांबा आणि वाट पाहा'चे धोरण - petrol price latest news

कोरोनावरील लसीची यशस्वी चाचणी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल ५० डॉलर राहिल्या आहेत.

पेट्रोल डिझेल दर
पेट्रोल डिझेल दर
author img

By

Published : Dec 26, 2020, 4:39 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शनिवारी स्थिर राहिल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी थांबा आणि वाट पाहा असे धोरण स्वीकारले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.७१ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३.८७ रुपये आहेत.

देशभरात पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा दर प्रति लिटर ८०.५१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८६.५१ रुपये आहे. डिझेलचा दर प्रति लिटर ७९.३१ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल प्रति लिटर ८५.१९ रुपये तर डिझेल ७७.४४ रुपये आहे.

कोरोनावरील लसीची यशस्वी चाचणी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल ५० डॉलर राहिल्या आहेत. बाजारपेठेत खनिज तेलाची मागणी पुन्हा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा-नवीन वर्षात फोक्सवॅगन इंडियाच्या वाढणार किमती

इंधनाच्या दरात घसरण-

पेट्रोलच्या किमतींनी ४ ऑक्टोबर २०१८ उच्चांक गाठून प्रति लिटर ८४ रुपये होते. तर ७ डिसेंबरला पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८३.७१ रुपये होती. मात्र, मार्चनंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. सप्टेंबरपासून पेट्रोलच्या किमती तर २ ऑक्टोबरपासून डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या होत्या. पुन्हा ८ डिसेंबरला इंधनाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.

हेही वाचा-फास्टॅग सर्व वाहनांसाठी १ जानेवारीपासून बंधनकारक-नितीन गडकरी

सरकारी तेल कंपन्यांकडून रोज घेतला जातो दराचा आढावा-

सरकारी तेल कंपन्यांकडून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या किमतीचे किरकोळ विक्रीचे दर निश्चित करण्यात येतात. कोरोनाच्या काळात पेट्रोल व डिझेलच्या किमती घसरल्या आहेत. कारण, जगभरातील देशांमध्ये टाळेबंदी घोषित केल्याने खनिज तेलाची मागणी कमी झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.