मुंबई - निफ्टीने १२, २८२ अंशाची नोंद करत विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी ट्विन्सचे शेअर मुंबई शेअर बाजारात वधारले आहेत. त्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३२० अंशाने वधारून ४१,६२६.६४ वर स्थिरावला.
निफ्टीचा निर्देशांक ९९.७० अंशाने वधारून १२,२८२.२० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
सर्वाधिक अल्ट्राटेक सिमेंटचे ४.३७ टक्क्यांनी शेअर वधारले. टाटा स्टील, इंडुसइंड बँक, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, ओएनजीसी बँक आणि आयटीसीचे शेअर वधारले. तर बजाज ऑटो, टीसीएस, इन्फोसिस, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, कोटक बँक आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर ०.८९ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-'या' शहरातील मेट्रोत मिळणार मोफत वायफाय सुविधा
चीनच्या मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणून आशियामधील बहुतांश शेअर बाजारात तेजी दिसून आली. देशातील भांडवली बाजारातही तेजी निर्माण झाली.
सोन्यासह चांदीचे दर अंशत: वधारले!
सोन्याचे दर नवी दिल्लीत प्रति तोळा ३८ रुपयांनी वधारून ३९,८९२ रुपये झाले आहेत. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोने प्रति तोळा ३९,८५४ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो २१ रुपयांनी वाढून ४७,७८१ रुपये झाला आहे. तर मागील सत्रात चांदीचा भाव प्रति किलो ४७,७६० रुपये होता.
हेही वाचा-ट्रायची प्रेक्षकांना नववर्षाची भेट : कमी पैशात दिसणार जादा प्रसारण वाहिन्या