मुंबई - निफ्टी आणि मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1,190.27 अंशांची घसरण निर्देशांक 32,348.10 वर पोहोचला.
निफ्टीचा निर्देशांक 274 अंशांनी 9,628 वर पोहोचला. वस्तू व सेवा (जीएसटी) परिषदेची आज 11वाजता बैठक सुरू झाली आहे. त्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारचा महसूल घटला आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटीचे दर वाढणार असल्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये व्यक्त होत आहे. टाळेबंदी आणि कोरोनामुळे देशातील विविध उद्योगावर परिणाम झाला आहे