नवी दिल्ली - जागतिकसह देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने शेअर बाजार गुंतवणूकदारांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने (हू) कोरोना 'साथीचा रोग' असल्याचे बुधवारी घोषित केले. त्यानंतर शेअर बाजारात सुमारे २४०० अंशांनी घसरण झाली. या घसरणीच्या फटक्याने गुंतवणूकदारांनी सुमारे आठ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.
मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांनी सुमारे १,२८,५६,८६९.१० कोटी रुपयांचे भांडवली मूल्य सकाळी साडेदहा वाजता गमाविले आहे. तर बुधवारी शेअर बाजार बंद होताना कंपन्यांनी १,३७,१३,५५८.७२ कोटी रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले होते.
संबंधित बातमी वाचा-'महामारीचा' दलाल स्ट्रीटने घेतला धसका; शेअर बाजारात २४०० अंशांनी घसरण
जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून काढून घेतलेला निधी या कारणांनी शेअर बाजार गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी ३ हजार ५१५.३८ कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी विक्री केली.
हेही वाचा-येस बँक : गतवर्षात मार्च ते सप्टेंबरदरम्यान ग्राहकांनी १८ हजार कोटी घेतले काढून!